Cyber Crime Dainik Gomantak
गोवा

Murgaon Crime News: मुरगावातील महिलेला घातला 1 कोटींचा गंडा; गोवा पोलिसांच्या सायबर सेलकडून एकाविरुद्ध गुन्हा दाखल

Cyber Crime: संशयित जॉन हुस्मान हा दररोज या ॲपवरून पैसे गुंतवलेल्या ग्राहकांना मार्गदर्शन करत असे. तो कोणत्या कंपनीत पैसे गुंतवणूक केल्यास फायदा आहे, याची माहिती देत होता.

गोमन्तक डिजिटल टीम

शेअर ट्रेडिंगमधून भरमसाट परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखवून मुरगाव येथील एका महिलेची १ कोटीची फसवणूक केल्याप्रकरणी सायबर गुन्हे विभागाने जाॅन पीटर हुस्मान याच्याविरोधात भादंसंच्या कलम ४१९, ४२० आणि माहिती व तंत्रज्ञान कायद्याच्या कलम ६६ ‘डी’ अंतर्गत गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे, अशी माहिती पोलिस अधीक्षक राहुल गुप्ता यांनी दिली.

सायबर गुन्हे विभागाकडे एका महिलेने गेल्या मे महिन्यात तक्रार दाखल केली होती. संशयित जॉन पीटर हुस्मान या नावाच्या इसमाने व्हॅट्सॲप व सोशल मीडियाच्या माध्यमांद्वारे संपर्क साधून तिला शेअर ट्रेडिंगमध्ये पैसे गुंतवल्यास त्यातून मोठा मोबदला देण्याचे आमिष दाखविले होते. त्यानंतर तक्रारदाराने त्याच्या आमिषाला भुलून एक ॲप डाऊनलोड केले व या ॲपच्या माध्यमातून त्यावर पैसे गुंतवण्यास सुरूवात केली. संशयित जॉन हुस्मान हा दररोज या ॲपवरून पैसे गुंतवलेल्या ग्राहकांना मार्गदर्शन करत असे. तो कोणत्या कंपनीत पैसे गुंतवणूक केल्यास फायदा आहे, याची माहिती देत होता.

सायबर गुन्हे विभागाने या तक्रारीची दखल घेत सायबर विभागाचे पोलीस अधीक्षक राहुल गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक दीपक पेडणेकर यांनी तपास सुरू केला आहे. संशयितांची माहिती अत्याधुनिक यंत्रणेच्या सहाय्याने घेण्यास सुरुवात केली आहे. त्याच्या या आमिषाला आणखी कितीजण बळी पडले आहेत, याचीही माहिती घेण्यात येत आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.

खाते ब्लॉक करताच आला संशय

संशयित जॉन हुस्मान याने तक्रारदार महिलेला सांगितल्यानुसार तिने लक्ष्मी एंटरप्रायझेसचे एसआयबी बँक खाते, झा एंटरप्रायझेसचे फेडरल बँक खाते, स्वीस इंटरनॅशनल प्रायव्हेट लिमिटेडचे आयडीएफसी बँक खाते तसेच अगरवाल रोडलाईन व स्पार्कल एंटरप्रायझेसच्या जन स्मॉल फायनान्स बँकेच्या खात्यात पैसे जमा करण्यास सांगितले होते. मात्र, काही दिवसांनी संशयिताने तक्रारदार महिलेच्या ॲपमधील खाते ब्लॉक केले. त्यावेळी त्या महिलेला आपली फसवणूक होत असल्याचे लक्षात आले व लगेच तिने सायबर गुन्हे विभागात तक्रार दाखल करण्यासाठी धाव घेतली होती. तोपर्यंत या महिलेने संशयिताने पाठविलेल्या विविध बँकांच्या खात्यामधून सुमारे कोटीची रक्कम गुंतविली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT