Goa Crime News: ड्रग्जविरोधात म्हापसा आणि कोलवाळ पोलिसांची मोठी कारवाई, दोघांच्या आवळल्या मुसक्या

Goa Police: म्हापसा बसस्थानकाजवळ 80 हजाराचे अमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी म्हापसा पोलिसांकडून छकौडी महतो (34, माडेल, मूळ, बिहार) याला अटक केली.
Goa Crime News: ड्रग्जविरोधात म्हापसा आणि कोलवाळ पोलिसांची मोठी कारवाई, दोघांच्या आवळल्या मुसक्या; एवढ्या किलोचा गांजा जप्त
arrestedDainik Gomantak
Published on
Updated on

गेल्या दिवसांत गोवा पोलिसांची ड्रग्जविरोधातील कारवाया वाढल्या आहेत. दोन दिवसांपूर्वी, कळंगुट येथून मूळचा ओडिशातील असणाऱ्या व्यक्तीकडून तब्बल 2 लाखांचा 2 किलो 115 ग्रम गांजा जप्त केला होता. बोडकेवड, कळंगुट येथे पोलिसांनी छापा टाकून ड्रग्ज प्रकरणात आरोपी बियंती गंथीरत्न माली याला ताब्यात घेण्यात आले होते. त्यानंतर त्याला अटक करण्यात आली. गोव्यात तो मधलेभाट शिवोली येथे राहत होता. याच पार्श्वभूमीवर आता गोवा पोलिसांनी (Goa Police) पुन्हा एकदा मोठी कारवाई केली आहे. म्हापसा बसस्थानकाजवळ 80 हजाराचे अमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी म्हापसा पोलिसांकडून छकौडी महतो (34, माडेल, मूळ, बिहार) याला अटक करण्यात आली.

याशिवाय, कोलवाळ येथील हाऊसिंग बोर्डात 42,700 रुपयांचे अमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी कोलवाळ पोलिसांकडून मलखान (30) याला अटक केली. काल (6 ऑगस्ट 2024 रोजी) रात्री उशिरा कोलवाळ पोलिसांकडून ही कारवाई करण्यात आली. पोलिस निरीक्षक विजय राणे यांच्या नेतृत्वाखाली पीआय विजय राणे, पीएसआय दत्तराज राणे, पीएसआय सुभाष गावकर, पीएसआय सनी कणेकर आणि इतर पोलिस कर्मचाऱ्यांच्या उपस्थित मलखानच्या मुसक्या आवळण्यात आल्या. आता एनडीपीएस (NDPS) कायद्याच्या कलम 20(b)(ii)(A) ​​अन्वये त्याच्याविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला असून या प्रकरणाचा पुढील तपास पीएसआय सनी काणेकर करत आहेत.

Goa Crime News: ड्रग्जविरोधात म्हापसा आणि कोलवाळ पोलिसांची मोठी कारवाई, दोघांच्या आवळल्या मुसक्या; एवढ्या किलोचा गांजा जप्त
Goa Crime News : अखेर फरार योगेश शेटकर विरोधात ‘लुक आऊट’ नोटीस ; पोलिसांना झुकांडी

ड्रग्ज प्रकरणात आरोपी बियंती गंथीरत्न मालीच्या अटकेत

दरम्यान, शुक्रवारी बोडकेवड येथे ड्रग्जचा मोठा व्यवहार होणार असल्याची माहिती कळंगुट (Calangute) पोलिसांना मिळाली होती. त्याआधारे पोलिसांनी ही कारवाई केली. बोडकेवड येथे एक तरुण संशयास्पदरित्या फिरत असल्याची दृष्टीस पडल्याने पोलिसांनी तात्काळ त्याला पकडले. झडती घेतल्यास त्याच्याकडून तब्बल 2 लाखांचा 2 किलो 115 ग्रम गांजा मिळाला. त्यानंतर पोलिसांनी संशयित तरुणाला पोलिस स्थानकात आणून त्याच्याविरुद्ध एनडीपीएस कायदा 1985 अन्वये गुन्हा नोंदवून अटक केली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com