Sudhir Kandolkar Dainik Gomantak
गोवा

कॉंग्रेस उमेदवार सुधीर कांदोळकर यांच्याविरुद्ध पोलिसांत गुन्हा दाखल

खोर्ली-म्हापसा येथे लोकांना आमिष दाखवण्याचा प्रयत्न करून आचारसंहितेचे उल्लंघन केल्याप्रकरणी म्हापसा पोलिसांत गुन्हा दाखल

दैनिक गोमन्तक

Goa Election Updates: विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांचे उमेदवार जय्यत तयारीला लागले आहे. उमेदवार प्रत्येक मतदारसंघांमध्ये घरोघरी प्रचार करताना दिसत आहेत. निवडणुकीवेळी मतांसाठी जनतेला वेगवेगळ्या प्रकारचे आमिष दाखवले जाते, असे आरोप अनेकांवर करण्यात येतात. अशीच एक घटना काल रात्री (मंगळवारी) कॉंग्रेसचे उमेदवार (Congress candidate) सुधीर कांदोळकर यांच्याबाबतीत घडली आहे.

खोर्ली-म्हापसा येथे लोकांना आमिष दाखवण्याचा प्रयत्न करून आचारसंहितेचे उल्लंघन करण्यात आले आहे. यासंबंधी सुधीर कांदोळकर आणि अज्ञाताविरुद्ध म्हापसा पोलिसांत गुन्हा दाखल झाल्याची माहिती समोर आली आहे. कांदोळकर हे लोकांना आमिष दाखवण्याचा प्रयत्न करत असल्याची विरोधकांनी तक्रार केली. याबाबत दोन्ही बाजूंचे लोक पोलीस स्थानकात दाखल झाले. काल रात्री गंगानगर येथे हा प्रकार घडला. (A case has been registered against Congress candidate Sudhir Kandolkar)

दरम्यान, म्हापशाच्या आमदारपदी निवडून आल्यानंतर दुसऱ्या दिवसापासूनच मी जनहितकारक विकासकामांना चालना देऊन म्हापसा हे गोव्यातील आदर्श शहर बनवणार आहे. त्यापैकी सर्वप्रथम दीर्घ काळ रखडलेला रवींद्र भवनचा (Ravindra Bhavan building) प्रश्न हाती घेतला जाईल, असे काँग्रेसचे उमेदवार सुधीर कांदोळकर यांनी सांगितले होते. पण आता त्यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यामुळे आणि निवडणुकीसाठी (Goa Assembly Elections 2022) अवघे काहीच दिवस शिल्लक असल्यामुळे याचे पडसाद मतदानावर होणार का, हे पाहणे महत्वाचे असणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ferrari Seized: महाराष्ट्रात नोंदणीकृत 7.5 कोटींची 'फेरारी' कर्नाटकमध्ये चालवली म्हणून केली जप्त; काय नेमकं प्रकरण? वाचा

Goa News Live: 54 जुन्या कदंब बस भंगारात; नव्या EV बसेस घेणार जागा

Operation Sindoor: 'भारत पाकिस्तानसोबत चीनशीही लढत होता...' ऑपरेशन सिंदूरबाबत भारतीय उप सेनाप्रमुखांचे मोठे वक्तव्य

BJP: इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे महिलेकडे जाणार? RSS चा ग्रीन सिग्नल; 'ही' तीन नावे चर्चेत

Goa Athletics: गोव्यात रंगणार 'मनोहर पर्रीकर स्मृती ॲथलेटिक्स स्पर्धा'; तारखा, ठिकाण जाणून घ्या..

SCROLL FOR NEXT