Car Accident Dainik Gomantak
गोवा

Car Hit a Holy Cross: फातोर्डा येथे कारची होली क्रॉसला धडक; कारचा चक्काचूर

होली क्रॉसचे मोठे नुकसान

दैनिक गोमन्तक

गोव्यात अपघातांची मालिका संपलेली नाही आज ही ती सुरुच राहीली. या पार्श्वभूमीवर मुरीदा फातोर्डा येथे आज रस्त्याच्या कडेला असलेल्या होली क्रॉसला एका कारने जोरदार धडक दिली आहे. या अपघातात कारचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच होली क्रॉस ही ढासळला आहे.

(A car accidently hit a Holy Cross along the roadside at Murida Fatorda )

मिळालेल्या माहितीनुसार आज फातोर्डा येथील मुरीदा परिसरात कारचा अपघात झाला आहे. या अपघातात मुरीदा येथे मुख्य रस्त्यावरुन प्रवास करताना कारने होली क्रॉसला जोरदार धडक दिल्याची घटना घडली आहे. या घटनेची माहिती मिळाताच फातोर्डा पोलिसांना घटनास्थळी दाखल होत पंचानामा केला आहे.

या घटनेत कार चालक जखमी झाला असून चालकाने आपली चुक मान्य करत होली क्रॉसचे झालेले नुकसान भरपाई देणार असल्याचे मान्य केले आहे. यावेळी अपघातास्थळावर काहीसा तणाव निर्माण झाला होता, तो निवळला आहे. यावेळी स्थानिकांनी असे अपघात होऊ नयेत यासाठी प्रशासनाने नियमावली घालावी अशी मागणी केली जात आहे. तसेच अपघातात जखमी झालेल्या चालकाची माहिती मिळू शकलेली नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

महिंद्राची नवी CNG SUV बाजारात; 9.99 लाखांपासून किंमत, दमदार लूकसह टाटा नेक्सॉन आणि ब्रेझाला देणार टक्कर

Ranji Trophy 2026: पिठिया-भार्गवच्या फिरकीपुढे गोव्याची शरणागती! बडोद्याचा डाव व 135 धावांनी दणदणीत विजय

Dharashiv Child Welfare Committee: बालकांच्या कल्याणासाठी उचललेल्या पावलांचे प्रतिज्ञापत्र द्या; गोवा खंडपीठाचे धाराशिव समितीला निर्देश

Mayem Mangrove Destruction: मयडेतील खारफुटींची कत्तल केल्याचा आरोप; 'ग्रीन ब्रिगेड'चा न्यायालयात जाण्याचा इशारा

Caller Name Display Rule: अनोळखी नंबरवरून फोन आल्यावर नावही दिसणार! स्पॅम कॉल, सायबर फसवणूक रोखण्यासाठी दूरसंचार विभागाचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT