Joseph Sequeira: ‘बिल्डर्स’पासून समुद्रकिनारे वाचवा!

Joseph Sequeira: कळंगुट फोरम : सागरी परिसराचे संरक्षण करण्याची मागणी
Joseph Sequeira| Goa News
Joseph Sequeira| Goa NewsDainik Gomantak
Published on
Updated on

Joseph Sequeira: सागरी किनारे तसेच सभोवतालच्या परिसराचे परप्रांतीय बिल्डर लॉबीपासून संरक्षण करण्याची मागणी करीत कळंगुट मतदारसंघ फोरमने अध्यक्ष प्रेमानंद दीवकर यांच्यासमवेत कार्यकर्त्यांनी स्थानिक पंचायतीला आज निवेदन सादर केले.

गेल्या वर्षभरात कांदोळी येथील समुद्र किनारी दिल्लीस्थित बिल्डरांकडून नवनव्या प्रकल्पांसाठी किनाऱ्यालगतची झाडे झुडपे बेकायदेशीरित्या कापण्यात आल्याचे दीवकर यांनी पंचायत मंडळाच्या निदर्शनात आणून दिले.

सीआरझेड तसेच प्रदूषण नियंत्रण बोर्डाचा कायदा धाब्यावर बसवून दिल्लीस्थित बिल्डर लॉबीकडून कांदोळीतील किनारी भागात असे प्रकार सर्रासपणे चालल्याचे त्यांनी सांगितले. आपले समुद्र किनारे तसेच तेथील नैसर्गिक संपदा टिकवून ठेवणे आता काळाची गरज होऊन बसलेली आहे त्यामुळे निदान यापुढे तरी बार्देशातील कुठल्याही समुद्र किनाऱ्यावर अथवा निर्बंधित क्षेत्रात बांधकामाला कुठल्याही प्रकारचे परवाने पंचायत मंडळाने देऊ नयेत.

तसेच आतापर्यंत याभागात उभारण्यात आलेल्या सर्वच्या सर्व अवैध बांधकामांवर सरकारी यंत्रणांकडून कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी कळंगुट फोरमने केली आहे. फोरमचे निवेदन स्वीकारण्साठी पंचायत कार्यालयात सरपंचासहित एकही पंचसदस्य उपस्थित नव्हता. शेवटी हे निवेदन कार्यालयातील नोंदणी पुस्तकात दाखल करण्यात आल्याची माहिती अध्यक्ष दीवकर यांनी दिली.

Joseph Sequeira| Goa News
Shantinagar Flyover: शांतीनगर वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटणार; मंत्री गुदिन्हो यांनी केली घोषणा, म्हणाले..

"गोवा आणि येथील किनारे आपल्या पूर्वजांकडून आपल्यासाठी राखून ठेवण्यात आलेली नैसर्गिक संपदा आहे. त्यामुळे निदान आपल्या कार्यकाळात तरी निर्बंधित परिसरात कुठलेही बेकायदा बांधकाम उभारण्याला परवाना दिला जाणार नाही. तसे आढळल्यास तात्काळ ते हटवू."

-जोजफ सिक्वेरा, सरपंच कळंगुट

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Anshul Kamboj Lookalike Police Officer
 Goa land ,Environment Protection
Calangute traffic cell electricity cut unpaid bill Goa
Goa Professional League final match result 2026
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com