Goa News Dainik Gomantak
गोवा

Panjim: ख्रिसमस पार्टीला गेलेल्या विद्यार्थिनीवर बसमध्ये बलात्कार, बस चालकाला अटक

आरोपी बस चालकाविरोधात पणजी पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विलास महाडिक

नाताळ पार्टीनिमित्त वास्कोहून पणजीत आलेल्या वास्कोतील एका विद्यार्थिनीवर मिनी बस चालकाने ती बसमध्ये एकटीच असल्याचा गैरफायदा घेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. ही घटना रविवारी (दि.25) संध्याकाळी पाटो - पणजी येथे पार्क केलेल्या मिनीबसमध्ये घडली. याप्रकरणी रात्री 11.41 वा. गुन्हा नोंद करून महिला पोलिसांनी बस चालक चंद्रशेखर वासू लमाणी (35) याला रात्रीच अटक केली आहे. या घटनेने खळबळ माजली असून पुन्हा राज्यातील प्रवासाबाबत असुरक्षिततेचा प्रश्‍न उपस्थित झाला आहे. संशयित सध्या झुआरीनगर बिर्ला वेर्णा येथील असून तो परप्रांतीय आहे.

मिळालेल्या माहितीनुसार नाताळ असल्याने काल सकाळी काही विद्यार्थी व विद्यार्थिनींचा एक गट वास्को येथून पणजीत नाताळ सण साजरा करण्यासाठी आला होता. या गटाने भाडेपट्टीवर मिनी बस (जीए 06 टी 5376) ठरविली होती. पणजीत ही मिनी बस पार्क होम हॉटेलजवळ उभी करण्यात आली होती. मिनी बसमधून सर्वजण उतरून पार्टी करण्यासाठी गेले. गटासोबत ही पीडित विद्यार्थिनीही होती. पार्टीमध्ये बहुतेक विद्यार्थी व विद्यार्थिनींनी मद्यप्राशन केले. पीडित विद्यार्थिनीला केलेल्या मद्यप्राशनामुळे अस्वस्थ वाटू लागल्याने ती आराम करण्यासाठी दुपारच्यावेळी पार्किंगमध्ये उभ्या करून ठेवलेल्या मिनीबसमध्ये आली. बाकीचा गट हे पार्टीमध्‍ये होते. गाडीमध्ये तिच्याशिवाय कोणीही नव्हते.

काहीवेळाने बस चालक मिनीबसजवळ आला व त्याला एक विद्यार्थिनी बसमध्ये झोपेत असलेली दिसली. काल नाताळ असल्याने या पार्किंग परिसरात वाहनांची वर्दळ कमी होती व जादा वाहने पार्क केलेली नव्हती. त्याने विद्यार्थिनीची हालचाल नसल्याने त्याने तिचा गैरफायदा घेण्यासाठी गाडीमध्ये घुसला. तिचे लैंगिक शोषण करण्यास सुरुवात केल्यावर या विद्यार्थिनीला जाग आली मात्र मद्याच्या नशेत असल्याने ती त्याला प्रतिकार करू शकली नाही. त्याचा फायदा उठवत या बस चालक नराधमाने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. यासंदर्भात कोणाला सांगशील तर तुझीच बदनामी होईल अशी धमकी दिली व तेथून तो निघून गेला.

पार्टीसाठी गेलेला विद्यार्थी - विद्यार्थिनींचा गट रात्री नऊच्या सुमारास मिनीबसकडे परतला तेव्हा पीडित विद्यार्थिनी भेदरलेल्या अवस्थेत होती. तिच्या एका मैत्रीणीने तिला यासंदर्भात विचारले असता तिने सांगितलेल्या घटनेवरून या गटाला धक्काच बसला. यासंदर्भातची माहिती पीडित विद्यार्थिनीच्या मैत्रिणीने महिला पोलिस स्थानकात दिली. लगेच पोलिसांनी हालचाली करत बस चालक संशयित चंद्रशेखर लमाणी याला ताब्यात घेऊन पोलिस स्थानकात आणले. पाटो - पणजी येथे पार्किंगमध्ये असलेल्या मिनी बसच्या ठिकाणी पंचनामा करण्यात आला. आज सकाळी फोरेन्सिक लेबोरेटरीच्या तज्ज्ञांनी बसमधील काही नमुने जमा केले. पीडित विद्यार्थिनी ही तरुणी असल्याने संशयिताविरुद्ध बलात्‍काराचा (कलम 376) गुन्हा दाखल केला आहे. आज संध्याकाळी त्याला पोलिस कोठडी घेण्यासाठी उभे केले जाणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Athletics: गोव्यात रंगणार 'मनोहर पर्रीकर स्मृती ॲथलेटिक्स स्पर्धा'; तारखा, ठिकाण जाणून घ्या..

Pakistani Team: 'पाकिस्तान' टीम खेळणार भारतात! क्रीडा मंत्रालयाकडून ग्रीन सिग्नल; 2 करंडकांमध्ये घेणार भाग

Goa Rain Update: गोव्यात जिकडे तिकडे पाणीच पाणी! पावसाचा रौद्रावतार; आपत्कालीन यंत्रणा सतर्क

Rahul Keni: गोव्याचे राहुल केणी बनले BCCIचे सामनाधिकारी! पंच परीक्षेत मिळवला सहावा क्रमांक

Goa Cyber Crime: रिचार्ज पॅक साठी फोन केला, 44 हजार रुपये केले लंपास; गोकुळवाडी-साखळीतील महिलेला गंडा

SCROLL FOR NEXT