Zuari Bridge: झुआरी पुलावर 'चहा आणि कोल्ड्रिंक्सचा स्टॉल', परवानगी दिली कोणी?

राज्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी नवीन झुआरी पुलावर सेल्फी घेऊन नागरिकांना पुल पाहण्यासाठी आमंत्रण दिले आहे.
Zuari Bridge, Go
Zuari Bridge, GoTwitter

वास्तुकलेचे उत्तम उदाहरण असलेला भारतातील एक उत्कृष्ठ पुल गोव्यातील झुआरी नदीवर उभारण्यात आला आहे. वाहतूक व्यवस्था सुरळीत होण्यासाठी हा पुल (Zuari Bridge, Goa) अतिशय महत्वाचा मानला जात आहे. उद्घाटनाचा मुहूर्त काही कारणास्तव पुढे ढकल्यानंतर नाताळचे औचित्य साधून हा पुल नागरिकांना पाहण्यासाठी रविवारी खुला करण्यात आला. अपेक्षेप्रमाणे पुलाचे सौंदर्य पाहण्यासाठी लोकांनी गर्दी देखील केली पण, पुलाची चर्चा होण्याऐवजी पुलावर अवैधपणे उभारण्यात आलेल्या चहा, कोल्ड्रिंक्स आणि खाद्यपदार्थाच्या स्टॉलची अधिक चर्चा होत आहे.

(Tea, Coldrink, And Food Stall Seen over Zuari Bridge)

Zuari Bridge, Go
New Year Celebration in Goa : गोवा फेस्टिव्ह मूडमध्ये; हॉटेल्स फुल्ल

राज्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत (CM Pramod Sawant) यांनी नवीन झुआरी पुलावर सेल्फी घेऊन नागरिकांना झुआरी पुल पाहण्यासाठी आमंत्रण दिले. 25 ते 28 डिसेंबर या कालावधीत झुआरी पुल सायंकाळी 5 ते रात्री 8 या वेळेत सामान्य नागरिकांसाठी खुला राहणार आहे. पुलावर नयनरम्य विद्युत रोषणाई देखील करण्यात आली आहे. नाताळनिमित्त राज्यात सुट्टी असल्याने मोठ्या प्रमाणावर नागरिक आणि पर्यटक पुलाचे सौंदर्य पाहण्यासाठी पोहोचले. पुलावर अनेकांनी फोटो सेल्फी काढून सोशल मिडियावर पोस्ट केले आहेत.

Zuari Bridge, Go
Free Cylinder in Goa : वर्ष सरले तरी सरकारची मोफत तीन सिलिंडर योजना ‘गॅस’वर

दरम्यान, पुलावर होणाऱ्या गर्दीचा व्यवसायासाठी फायदा घेण्याची शक्कल लढवत एकाने पुलावर चक्क चहा, कोल्ड्रिंक्स आणि खाद्यपदार्थाचा स्टॉल उभारला. पुल पाहण्यासाठी आलेल्या नागरिकांनी स्टॉलवर चहा, कोल्ड्रिंक्स आणि खाद्यपदार्थ घेण्यासाठी गर्दी केल्याचे फोटो सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहेत. अनेकांनी चहा आणि पुलासोबतचे फोटो देखील पोस्ट केले आहेत. या स्टॉलसाठी परवानगी कोणी दिली असा सवाल देखील नागरिक उपस्थित करत आहेत. एका युझरने यावर, 'देश कोण चालवतयं असे तुम्हाला वाटते'? अशी प्रतिक्रिया दिली आहे.

Zuari Bridge, Go
New Zuari Bridge : मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला नागरिकांचा प्रतिसाद; नव्या झुआरी पुलावर नागरिकांची गर्दी

मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी झुआरी पुल पाहण्यासाठी झालेल्या गर्दीचा एक व्हिडिओ आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून शेअर केला आहे. पुल पाहण्यासाठी केलेल्या आवहनाला युवा वर्गाने चांगला प्रतिसाद दिला आहे. सणोत्सवाच्या काळात हा पुल सर्वांसाठी नवे आकर्षण ठरत आहे. असे मुख्यमंत्री सावंत यांनी म्हटले आहे.

Zuari Bridge, Go
New Year Celebration : गोव्यात नववर्षाच्या पार्श्वभूमीवर किनारपट्टी भागात पोलिस बंदोबस्त तैनात

दरम्यान, झुआरी पुलाची एक लेन येत्या 29 डिसेंबरपासून वाहतूकीसाठी सुरू होणार आहे. केंद्रीय रस्ते आणि वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते या पुलाचे उद्धाटन होणार आहे. सुरूवातीला 26 डिसेंबर रोजी होणारे उद्घाटन काही कारणास्तव पुढे ढकलण्यात आले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com