Akshay Kumar Video: अभिनेता अक्षय कुमार गोव्यात; त्यानं दिलेल्या ख्रिसमसच्या शुभेच्छा एकदा पाहाच

अक्षय गिटार हातात घेऊन बेधुंदपणे नाचताना दिसत आहे.
Akshay Kumar in Goa Video Viral | Akshay Kumar | Twinkle khanna |
Akshay Kumar in Goa Video Viral | Akshay Kumar | Twinkle khanna | Instagram

बॉलिवूडचा सुपस्टार अभिनेता अक्षय कुमार (Bollywood Actor Akshay Kumar) त्याच्या बिन्धास्त आणि हटके अंदाजासाठी ओळखला जातो. अक्षय कुमार नाताळची सुट्टी एन्जॉय करण्यासाठी सध्या गोव्यात आहे. नाताळनिमित्त (ख्रिसमस) (Christmas) अक्षयने त्याच्या अंदाजात सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत. अक्षय शुभेच्छा देतानाचा हा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. यात अक्षय गिटार हातात घेऊन बेधुंदपणे नाचताना दिसत आहे.

(Actor Akshay Kumar Is in Goa to celebrate Christmas share video of himself dancing)

अक्षय कुमारने नाताळच्या शुभेच्छा दिलेल्या हा व्हिडिओ आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंवरून शेअर केला आहे. अक्षय एका रिसॉर्टवर थांबला असून, स्विमिंग पूलच्या जवळ उभा राहून त्यांने "आय विश यु मेरी ख्रिसमस" या गाण्यावर हातात गिटार घेऊन ठेका धरला आहे. हा व्हिडिओ सध्या तुफान व्हायरल होत आहे.

दरम्यान, अक्षयच्या या व्हिडिओवर त्याची पत्नी ट्विंकल खन्ना हिने प्रतिक्रिया दिली आहे. "मला आनंद होत आहे की मी यावेळी रूममध्येच होती पण हे पाहू शकले नाही." अशी कमेन्ट ट्विंकल खन्नाने दिली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com