9th World Ayurveda Congress  Dainik Gomantak
गोवा

Kala Academy Goa: नवव्या जागतिक आयुर्वेद काँग्रेसमध्ये '40' विद्यार्थ्यांचा सहभाग

Kala Academy Goa: नवव्या जागतिक आयुर्वेद काँग्रेस आणि आरोग्य एक्स्पोचे कला अकादमीत आयोजन करण्यात आले आहे.

दैनिक गोमन्तक

Kala Academy Goa: कला अकादमी येथे 8 ते 11 डिसेंबरदरम्यान होणाऱ्या 9 व्या जागतिक आयुर्वेद काँग्रेस आणि आरोग्य एक्स्पोमध्ये सहभागी होण्यासाठी शिक्षण संचालनालयाने राज्यभरातील शाळांना प्रत्येकी 40 विद्यार्थ्यांना पाठवण्यास सांगितले आहे. जागतिक आयुर्वेद फाउंडेशनतर्फे आयोजित केलेल्या या कार्यक्रमाला केंद्रीय आयुष मंत्रालय आणि राज्य सरकारकडून साहाय्य केले जात आहे.

आयुर्वेद काँग्रेस आणि आरोग्य एक्स्पोच्या सत्रांमध्ये उद्‍घाटन आणि समारोप सत्रांसह विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार आहे. सर्व शासकीय, सरकारी, अनुदानित, विना अनुदानित माध्यमिक, उच्च माध्यमिक आणि विशेष शाळांच्या प्रमुखांनी या कार्यक्रमाला भेट देण्यासाठी इयत्ता आठवी ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना दोन शिक्षकांसोबत पाठवावे, असे शिक्षण संचालनालयाने आदेशात म्हटले आहे.

विद्यार्थ्यांच्या वाहतुकीसाठी बालरथ बसेसचा वापर करता येईल. शालेय संस्थांना तालुकानिहाय कार्यक्रमाला भेट देण्याचे वेळापत्रकही जारी केले आहे.

शाळा भेटीचे तालुकावार वेळापत्रक

  • 8 डिसेंबर - तिसवाडी - दुपारी 2 ते 3.30 वा.

  • 8 डिसेंबर - बार्देश - 3 ते 4.30 वा.

  • 9 डिसेंबर - काणकोण, सांगे, केपे - सकाळी 10 ते 11 वा.

  • 9 डिसेंबर - सासष्टी, पेडणे - दुपारी 2.30 ते 4 वा.

  • 10 डिसेंबर - सत्तरी, डिचोली, धारबांदोडा - सकाळी 10 ते 11.30 वा.

    (दुसऱ्या सत्रात मुरगाव, फोंडा येथील विद्यार्थी दुपारी 2.30 ते सायंकाळी 4 या वेळेत कार्यक्रमाला भेट देतील.)

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pakistani Army: दहशतवादाचं फंडिंग आणि पश्तूनांची हत्या! दावोसमध्ये पाकिस्तानी लष्कराचा फाटला बुरखा

Old Buses in Goa: कालबाह्य बसगाड्यांमुळे गोव्याची हवा झाली विषारी! प्रदूषणाचे नियम धाब्यावर; प्रवाशांचा जीव टांगणीला

BCCI Central Contracts: रोहित-विराटचं होणार 'डिमोशन'? BCC लवकरच घेणार मोठा निर्णय; जडेजा अन् बुमराहालाही फटका

Feista Do Pavo: ..लोकांचा, लोकांद्वारे आणि लोकांसाठी असणारा ‘फेस्ता दो पावो’

Tourist Safety: पर्यटकांच्या सुरक्षेसाठी गोवा सरकार अ‍ॅक्शन मोडमध्ये; हॉटेल नोंदणीचे नियम बदलले! आता 'Fire NOC' बंधनकारक

SCROLL FOR NEXT