Goa Corona Update Dainik Gomantak
गोवा

Goa Corona Update : राज्यात गेल्या 24 तासात 88 नवे कोरोनारूग्ण; जाणून घ्या सक्रीय रूग्णसंख्या...

राज्यात कोरोनामुक्तीचा दर 98.27 टक्के इतका

दैनिक गोमन्तक डिजिटल

कोरोना बाधितांच्या संख्येबाबत रोज नवनवीन आकडेवारी समोर येत असून आरोग्य विभाग सतर्क झाला आहे. त्यातच आंतरराष्ट्रीय पातळीवरील जी-20 शिखर परिषदेच्या आठ बैठका गोव्यात होत आहेत. दरम्यान गुरुवारी कोरोना रुग्णांच्या संख्येत बुधवारच्या तुलनेत वाढ झालेली दिसून आली.

आज प्राप्त झालेल्या अहवालानुसार गेल्या 24 तासात 652 चाचण्या करण्यात आल्या. त्यात 88 नवीन कोरोनाचे रुग्ण आढळून आले असून त्यापैकी 5 रुग्णांना रूग्णालयात दाखल केले आहे तर उर्वरीत 83 बाधितांना होम आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले आहे. गेल्या 24 तासांमध्ये एकूण 5 रूग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

राज्यात आत्तापर्यंत कोरोनामुळे 4014 मृत्यू झाले आहेत. गेल्या 24 तासांमध्ये कोरोनामुळे राज्यात एकाही व्यक्तीचा मृत्यू झालेला नाही हि दिलासादायक बाब आहे. राज्यात कोरोनामुक्तीचा दर 98.27 टक्के इतका आहे. राज्यात एकूण 2 लाख 61हजार 877 कोरोनारूग्ण आढळून आले होते. त्यापैकी 2 लाख 57 हजार 351 रूग्ण बरे झाले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

खरी कुजबुज: सत्ताधारी, विरोधक एकत्र

वापरलेल्या तेलाचा आरोग्‍याला फटका! राज्यातील गाडे, छोट्या हॉटेल्‍सना होतोय मोठ्या प्रमाणात पुरवठा; स्ट्रीट फूड लव्हर्ससाठी धोक्याची घंटा

Goa Politics: "सासष्टीत कोणालाही गृहीत धरु नका!" भाजपला रोखण्यासाठी काँग्रेसचा 'मास्टर प्लॅन' तयार; नवनियुक्त कार्याध्यक्षांनी दिले मोठे संकेत

Benaulim Beach Bull Drowning: गोव्यात बंदी असतानाही बाणावलीत बैलांची झुंज; समुद्रात बुडून बैलाचा दुर्दैवी मृत्यू, परिसरात खळबळ

Goa Agriculture Subsidy: कार्यालयात बसू नका, शेतात जाऊन मार्गदर्शन करा! मुख्‍यमंत्र्यांनी पिळले अधिकाऱ्यांचे कान; कृषी अनुदान रक्‍कम दोन महिन्‍यांत

SCROLL FOR NEXT