Sanquelim Municipal Council Election : किती अर्ज मागे, किती उमेदवार रिंगणात? असे आहे साखळी पालिका निवडणूकीचे चित्र

दोघा उमेदवारांची निवड बिनविरोध
Sanquelim Municipal Council Election
Sanquelim Municipal Council ElectionDainik Gomantak
Published on
Updated on

फोंडा आणि साखळी नगरपालिका निवडणुकांसाठी एकूण 108 अर्ज ग्राह्य ठरवण्यात आले होते. यातील साखळी पालिकेसाठी 57 अर्ज सादर झालेले होते. दरम्यान साखळी नगरपालिका निवडणूकीत दोघा उमेदवारांची बिनविरोध निवड झाली आहे. या निवडणूकीत एकूण 23 उमेदवारांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले.

Sanquelim Municipal Council Election
Pernem Taxi Stand Issue : ‘मोपा’वरील टॅक्सी स्टॕंडचा प्रश्‍न सुटणार

साखळी नगरपालिका निवडणूकीत प्रभाग क्रमांक 5 मधून प्रविण ब्लॅगन यांची बिनविरोध निवड तर प्रभाग क्रमांक 8 मधून रियाज खान यांची बिनविरोध निवड झाली आहे. माजी नगराध्यक्ष रियाज खान यांनी सगलानींची साथ सोडत हल्लीच त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. या निवडणूकीत बिनविरोध निवडून येत त्यांची साखळी नगरपालिकेवर दुसऱ्यांदा निवड झाली आहे.

तर टुगेदर फॉर साखळी गटाचे प्रविण ब्लॅगन यांची प्रभाग क्रमांक 5 मधून बिनविरोध निवड झाली आहे. साखळी नगरपालिका निवडणूकीत एकूण 23 उमेदवारांनी निवडणूकीतून माघार घेतली आहे. त्यामुळे आता साखळीत 12 प्रभागांमधून 31 उमेदवार रिंगणात आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com