8-year-old boy committed suicide In Goa Dainik Gomantak
गोवा

धक्कादायक! उत्तर प्रदेशच्या 8 वर्षीय चिमुकल्याची गोव्यात आत्महत्या

एका आठ वर्षांच्या मुलाने आत्महत्या करणे ही मनाला चटका लावणारी गोष्ट आहे.

दैनिक गोमन्तक

मडगाव: खेळता खेळता आपल्या मित्राचा घेतलेला मोबाईल हातून पडून फुटल्याने कोणीतरी रागावेल या भीतीपोटी एका आठ वर्षीय मुलाने आपल्या आईचा दुपट्टा गळ्याभोवती आवळून आत्महत्या केली. नेसाय येथे काल सायंकाळी ही घटना घडली. या धक्कादायक घटनेमुळे संपूर्ण गोवा राज्य हादरुन गेले. (8-year-old boy committed suicide In Goa)

मूळ उत्तर प्रदेश (UP) येथील एक कामगार कुटुंब नेसाय येथे एका भाड्याच्या खोलीत राहत होते. त्यांना एक मुलगा आणि दोन मुली अशी अपत्ये होती. मित्रासोबत खेळताना त्यांच्या मुलाकडून मोबाईल फुटला. त्यानंतर हा मुलगा धावत आपल्या खोलीत गेला. त्याने आईचा दुपट्टा घेतला व जवळच्या मैदानात जाऊन त्याने दुपट्ट्याने आपला गळा आवळला अशी माहिती समोर आली आहे. दरम्यान, या आठ वर्षीय मुलाला मडगाव येथील जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी आणले असता, त्याचे निधन झाल्याचे सांगण्यात आले.

एका आठ वर्षांच्या मुलाने आत्महत्या करणे ही मनाला चटका लावणारी गोष्ट आहे. हे वय साधकबाधक विचार करू शकणारे नव्हे. अनेकदा अशी मुले अशा आत्महत्येच्या गोष्टी ऐकतात किंवा पाहतात. त्याचा प्रभाव त्यांच्या मनात खोलवर होत असतो. त्यांच्या हातून काही चुका होतात. त्यावेळी त्यांनाही तसेच करावेसे वाटते. अशा मुलांना खरे तर पालक आणि समाजाने धीर देण्याची गरज असते. मुलांचे मोबाईलमध्ये सतत डोकावणे घातक आहे.

डॉ.राजेंद्र हेडगे, मानसोपचार तज्ज्ञ

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ponda By Election: फोंड्यात निवडणुकीचे पडघम! दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला; कोणाची लागणार लॉटरी?

Birch By Romeo Lane Case: 'बर्च बाय रोमियो लेन' प्रकरणात ॲड. रोहित ब्रास-डिसांचा राजीनामा; न्यायाधीशांवर केले गंभीर आरोप

Goa Govrnment Jobs: सरकारी नोकरीचे स्वप्न होणार पूर्ण! विधानसभा निवडणुकीआधी नोकऱ्यांचा पाऊस; मुख्यमंत्र्यांचा मास्टरस्ट्रोक

सॅम्युअल मृत्यू प्रकरणाला नवं वळण; पोलिस अधीक्षकांनी नोंदवले ब्रागांझा कुटुंबीयांचे जबाव, पोलिसांच्या कारवाईवर आमदार फेरेरांचे आक्षेप

Mala Lake Fish Death: मळा तलावातील माशांचा रहस्यमय मृत्यू! उच्च न्यायालयाच्या तडाख्यानंतर 32 घरांना बसला सांडपाणी जोडणीचा वेढा

SCROLL FOR NEXT