GMC भरती घोटाळा आता उच्च न्यायालयाच्या रडारवर
पणजी: गोवा मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल, बांबोळीमधील वादग्रस्त 1,000 नोकरी भरती मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा (एचसी) मध्ये खटला चालु असून, बेकायदेशीर नियुक्तींना आव्हान देणारी ही याचिका असणार आहे.(Goa GMC recruitment scam now filed in High Court)
ज्येष्ठ RSS कार्यकर्ता सुभाष वेलिंगकर यांचे पुत्र, कार्यकर्ते शैलेंद्र वेलिंगकर यांनी या वर्षाच्या सुरुवातीला सार्वजनिक हित याचिका (Public Interest Litigation) दाखल केली होती. यामध्ये याचिकेमध्ये सरकारी हॉस्पिटलमधील पदांच्या भरती प्रक्रियेत घोटाळा झाल्याचा आरोप करण्यात आला होता. या जनहित याचिकामध्ये म्हटले आहे की, अनेक श्रेणींमध्ये 1,371 पदांसाठी जी भरती (GMC Job Scam) करण्यात आली आहे ती "बेकायदेशीर आणि असंवैधानिक" आहे; असा अरोप करण्यात आला आहे.
न्यायमूर्ती एम एस सोनक आणि न्यायमूर्ती आर एन लड्ढा यांच्या खंडपीठाने स्पष्ट केले की, "नियुक्त्या आधीच झाल्या असल्याने, अशा नियुक्त्या या याचिकेतील अंतिम आदेशाच्या अधीन असतील."
पात्र उमेदवारांना न्याय मिळावा यासाठी वेलिंगकर यांनी आपल्या याचिकेत आरोप केला आहे की, भरती प्रक्रियेत सर्व नियमांचे उल्लंघन केले आहे आणि बहुसंख्य निवडलेले उमेदवार हे आरोग्य मंत्री विश्वजित राणे यांच्या माहितीतील असल्याने नोकरी भरती मनमानी आणि गुप्त पद्धतीने पार पाडले गेले. PIL ने (Goa GMCH) मधील 30 मल्टी टास्किंग स्टाफ (MTS) साठी जारी केलेल्या नियुक्तीच्या आदेशावर आक्षेप घेतला कारण त्याने उमेदवारांना भरती करताना अनेक भरती कायद्यांचे उल्लंघन केले आहेत. जनहित याचिकेद्वारे बेकायदेशीर आणि भेदभावपूर्ण भरती मोहिमेविरुद्ध सामान्यत: जनतेवर झालेल्या अन्यायाविरूध्द मदत करते.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.