Goa G20 Meeting Dainik Gomantak
गोवा

Goa G20 Meeting: स्वित्झर्लंडचे 7, अमेरिकेचे 2 प्रतिनिधी G20 बैठकीसाठी गोव्यात दाखल

आंतरराष्ट्रीय प्रतिनिधींचा पहिला गट दाबोळी विमानतळावर उतरला

Akshay Nirmale

Goa G20 Meeting: गोव्यात G20 च्या एकूण आठ बैठका होणार आहेत. त्यातील पहिली बैठक येत्या सोमवारपासून (17 एप्रिलपासून) सुरू होत आहे. ही बैठक आरोग्यविषयक असणार आहे. या बैठकीसाठी आंतरराष्ट्रीय प्रतिनिधींचा पहिला गट गोव्यात दाखल झाला आहे. पीटीआयने याबाबतचे वृत्त दिले आहे.

17 एप्रिलपासून सुरू होणार्‍या तीन दिवसीय आरोग्य कार्य गट G20 बैठकीसाठी गोव्यात येणारा हा आंतरराष्ट्रीय प्रतिनिधींचा पहिला गट आहे. स्वित्झर्लंडचे सात आणि अमेरिकेचे दोन प्रतिनिधी आज पहाटे दाबोळी आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचले, असे वरिष्ठ सरकारी प्रवक्त्याने सांगितले.

या प्रतिनिधींचे संगीतमय कार्यक्रमाने स्वागत केले गेले. विमानतळावरील केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (CISF) कर्मचारी आणि नियुक्त अधिकाऱ्यांनी त्यांना आरक्षित विश्रामगृहात नेले.

"प्रतिनिधींचे स्वागत करण्यासाठी आगमन गेटवर रांगोळी काढण्यात आली. त्यानंतर त्यांना विमानतळाबाहेर रेड कार्पेटवर आणि नंतर पणजीजवळील कार्यक्रमस्थळी नेण्यात आले.

दाबोळी विमानतळावर किंवा मोपा येथील मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळावर पुढील दोन दिवसांत इतर देशांतील प्रतिनिधी गोव्यात येतील.

प्रतिनिधींच्या आगमनाची प्रक्रिया सुरळीत पार पडावी यासाठी विमानतळांनी तशी व्यवस्था केली आहे. याव्यतिरिक्त, मनी एक्सचेंज काउंटर आणि सिम कार्ड काउंटर यांसारख्या सेवा विमानतळांवर उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. दरम्यान, सध्या G20 चे अध्यक्षपद भारताकडे आहे. G20 हा जगातील 20 प्रमुख विकसित आणि विकसनशील अर्थव्यवस्थांचा समूह आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Stray Dogs: भटक्या कुत्र्यांबाबत मार्गदर्शक तत्त्‍वे फलकावर लावा, शिक्षण संस्‍थांना निर्देश; परिपत्रक जारी

Vande Bharat Express: 'वंदे भारत' एक्सप्रेस कोझिकोडपर्यंत हवी, खासदार सदानंद शेट तानावडे यांची राज्यसभेत मागणी

Yashasvi Jaiswal Hospitalized: यशस्वी जयस्वालची प्रकृती अचानक बिघडली, रुग्णालयात दाखल

Goa University Election: विद्यापीठ निवडणूक अचानक रद्द, 15 मिनिटे आधी पत्रक; अभाविप ,एनएसयूआयकडून धरणे आंदोलन

Horoscope: बुधवारी तुमच्या राशीत काय? मेष-मिथुनला पार्टनरकडून खास भेट, कर्कचे जुने टेन्शन दूर होणार

SCROLL FOR NEXT