CAPF Exam: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली ऐतिहासिक निर्णय घेत गृह मंत्रालयाने केंद्रीय सशस्त्र पोलिस दलांसाठी (CAPFs) कॉन्स्टेबल (जनरल ड्युटी) परीक्षा हिंदी आणि इंग्रजीशिवाय 13 प्रादेशिक भाषांमध्ये घेण्यास मान्यता दिली आहे. CAPF मध्ये स्थानिक तरुणांचा सहभाग वाढवण्यासाठी आणि प्रादेशिक भाषांना प्रोत्साहन देण्यासाठी गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांच्या पुढाकाराने हा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला आहे.
हिंदी आणि इंग्रजी व्यतिरिक्त, प्रश्नपत्रिका खालील 13 प्रादेशिक भाषांमध्ये असेल
आसामी, बंगाली, गुजराती, मराठी, मल्याळम, कन्नड, तमिळ, तेलुगु, ओडिया, उर्दू, पंजाबी, मणिपुरी, कोकणी
या निर्णयामुळे लाखो उमेदवार त्यांच्या मातृभाषा/प्रादेशिक भाषेत परीक्षा देऊ शकतील, ज्यामुळे त्यांची निवड होण्याची शक्यता देखील वाढेल.
कॉन्स्टेबल (जनरल ड्युटी) ही स्टाफ सिलेक्शन कमिशनद्वारे घेतली जाणारी एक प्रमुख परीक्षा आहे, ज्यामध्ये देशभरातून लाखो उमेदवार बसतात. हिंदी आणि इंग्रजी व्यतिरिक्त, ही परीक्षा 01 जानेवारी 2024 पासून 13 प्रादेशिक भाषांमध्ये घेतली जाईल.
CAPF मध्ये स्थानिक तरुणांचा सहभाग वाढवण्यासाठी आणि प्रादेशिक भाषांना प्रोत्साहन देण्यासाठी गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांच्या पुढाकाराने हा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला आहे.
मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी केंद्र सरकारने घेतलेल्या या निर्णयाचे स्वागत केले आहे. मी अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांचे आभार मानतो. या ऐतिहासिक निर्णयामुळे CAPF परीक्षेत अनेक उमेदवारांना भाग घेता येईल. असे सावंत यांनी म्हटले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.