पणजी: गोव्यात मागील पंधरा दिवसात 647 विविध दुर्घटना घटना घडल्या आहेत. यामध्ये 9 मानवी जीव आणि 7 प्राणी दगावले आहेत. (34 Animals and 11 Humans died) या घटनामध्ये सर्वाधिक 552 घटना या हवामान संबधित आपत्तीच्या आहेत. 05 ते 19 जुलै या पंधरा दिवसांच्या कालावधीतील ही आकडेवारी आहे. गोवा अग्निशमन आणि आपत्कालीन सेवा संचालनालयाने (Directorate of Fire & Emergency Services Goa) मागील हा अपहवाल प्रसिद्ध केला आहे.
जुलै महिन्याच्या सुरूवातीपासून राज्यात पावसाचा (Monsoon) जोर वाढला. याकाळात राज्यात अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडणे, पाणी साचने, आग यासारख्या विविध घटना घडल्या. राज्यात मागील पंधरा दिवसांत 647 घडलेल्या विविध आपत्ती घटनामध्ये अगीच्या 13, आपात्कालिन 65, जमिनीवरील 6, पाण्यासंबधित 11 आणि हवामानासंबधित सर्वाधिक 552 दुर्घटना घडल्या आहेत. यामध्ये 09 मानवी आणि 07 पशूंची जीवितहाणी झाली आहे. अशी माहिती गोवा अग्निशमन आणि आपत्कालीन सेवा संचालनालयाने आहे.
तसेच, याच कालावधीत 34 प्राण्यांचा आणि 11 माणसांचा जीव वाचविण्यात अग्निशमन आणि आपत्कालीन दलाला यश आले आहे. विविध घटनांमध्ये 48 लाख 71 हजार 500 रूपयांचे नुकसान झाले असून, एक कोटी 46 लाख रूपयांचे नुकसान वाचविण्यात दलाला यश आले आहे. अशी माहिती या अहवालात देण्यात आली आहे.
गोवा मध्य विभागात सर्वाधिक 42 टक्के घटना घडल्या आहेत. तर दक्षिण विभागात 31 टक्के आणि उत्तर विभागात 27 टक्के दुर्घटना घडल्या आहेत. असे अहवाल सांगतो. 05 ते 07 (170), 08 ते 10 (154), 11 ते 13(98), 14 ते 16 (175) आणि 17 ते 19 (50) घटनांची नोंद करण्यात आली आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.