गोवा विधानसभा उपसभापती पदासाठी उद्या निवडणूक

भाजपतर्फे आमदार ज्योशुआ डिसोझा तर काँग्रेसतर्फे डिलायला लोबो उमेदवारी अर्ज दाखल करणार.
Goa Assembly Deputy Speaker election
Goa Assembly Deputy Speaker electionDainik Gomantak

पणजी : गोवा विधानसभा उपसभापती पदासाठी उद्या 22 जुलै रोजी निवडणूक होणार आहे. या निवडणुकीसाठी भाजपतर्फे आमदार ज्योशुआ डिसोझा तर काँग्रेसतर्फे डिलायला लोबो उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. त्यामुळे ही निवडणूक चुरशीची होण्याची शक्यता आहे.

दरम्यान म्हापशाचे आमदार ज्योशुआ डिसोझा यांनी गोवा राज्य मंत्रिमंडळात स्वत:ला मंत्रिपद मिळावे यासाठी विविध माध्यमांतून बरेच प्रयत्न केले असले, तरी शेवटपर्यंत त्यांना मंत्रिपद मिळूच शकले नाही. अखेरीस त्यांना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या अध्यक्षपदाखाली कार्यरत असलेल्या गोवा राज्य साधनसुविधा विकास महामंडळाच्या उपाध्यक्षपदावरच समाधान मानावे लागले. त्यामुळे ज्योशुआ नाराज असल्याची चर्चा सुरु होती.

Goa Assembly Deputy Speaker election
पुन्हा अपेक्षाभंग, ज्योशुआ डिसुझांना मंत्रिपदाची हुलकावणी

दुसरीकडे ज्योशुआ डिसुझा यांनी मुरगाव नियोजन आणि विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारला आहे. त्यांची एमपीडीएच्या अध्यक्षपदी गेल्या महिन्यात निवड झाली होती. परंतु त्यांनी पदभार स्वीकारला नव्हता. एमपीडीएच्या अध्यक्षपदासाठी वास्कोमधील अनेक राजकीय नेते काही ज्येष्ठ नगरसेवक शर्यतीत होते. परंतु ते यशस्वी होऊ शकले नाहीत.

ज्योशुआ डिसुझांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न विधानसभा उपाध्यक्षपद देऊन भाजपकडून केला जाणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com