turtles lay their eggs Dainik Gomantak
गोवा

17 घरट्यांमध्ये कासवांची 570 अंडी, यंदा 6 दिवस अगोदर आगमन

भटक्या कुत्र्यांचा उपद्रव

दैनिक गोमन्तक

आगोंद : आगोंद व गालजीबाग येथील कासव संवर्धनासाठी आरक्षित समुद्र किनाऱ्यावर उशिरा का होईना सागरी कासवांच्या आगमनामुळे वन खात्याच्या अधिकाऱ्यांनी समाधान व्यक्त केले. या दोन्ही ठिकाणी 24 कासवांनी एकूण 17 घरट्यांमध्ये 570 अंडी घातली. ही सर्व अंडी संरक्षित केली आहेत. 8 दिवसांपूर्वी 4 ऑलिव्ह रिडले कासवांची पिल्ले समुद्रात (sea) सोडण्यात आली.

शुक्रवार, 31 डिसेंबर रोजी पहाटे या हंगामातील पहिल्या सागरी कासवाने 118 अंडी घातली होती. सोमवार, 3 रोजी 2 रिडले कासवांनी 90 अंडी दिली, तर गुरुवारी रात्री आणखी एका कासवाने 118 अंडी घातली, अशी माहिती कासव संवर्धन केंद्राचे प्रमुख अजय पागी यांनी सांगितले. या घटनेची माहिती मिळताच बार्से येथील वन खात्याचे अधिकारी आनंद वेळीप व अन्य कर्मचाऱ्यांनी या केंद्राला भेट देऊन पाहणी केली.

गोव्याचे (goa) तत्कालीन मंत्री तथा आगोंदचे सुपुत्र स्व. संजय बांदेकर यांच्या प्रयत्नांतून उत्तर गोव्यात मोरजी तर दक्षिण गोव्यात आगोंद आणि गालजीबाग असे तीन समुद्र किनारे कासव संवर्धनाकरिता राखीव ठेवण्यात आले आहेत.

- यंदा 6 दिवस अगोदर आगमन

गेल्या वर्षी दिनांक 7 जानेवारी‌ रोजी पहिल्या कासवाने आगोंद किनाऱ्यावर अंडी घातली होती. यंदा मात्र 6 दिवस अगोदर म्हणजे, 31 डिसेंबर रोजीच कासवाचे आगमन आगोंद किनाऱ्यावर झाल्यामुळे पर्यावरणप्रेमी (environment) नागरिकांकडून समाधान व्यक्त केले जात आहे. गेल्या वर्षी पहिल्या एकूण 34 कासवांनी 2 हजारांपेक्षा जास्त अंडी या किनाऱ्यावर घातली होती.

- जन्मभूमीशी नाते जोडतात कासवे

साधारणपणे अंडी दिल्यानंतर 40 ते 52 दिवसांमध्ये या अंड्यांतून पिल्ले बाहेर येतात. त्यांना वन खात्याचे अधिकारी सुरक्षितरित्या समुद्रात सोडतात येते. विशेष म्हणजे, या किनाऱ्यावर ज्या पिलांनी जन्म घेतला, त्यापैकी मादी कासव पुन्हा याच किनाऱ्यावर येऊन अंडी घालतात, अशी माहिती अजय पागी यांनी या प्रतिनिधीशी बोलताना दिली.

- भटक्या कुत्र्यांचा उपद्रव

दरवर्षीच्या हंगामात जेव्हा कासव अंडी (eggs) घालण्यासाठी किनाऱ्याकडे येतात, तेव्हा येथे 10 ते 12 भटक्या कुत्र्यांचा कळप उपद्रवी ठरतो. कासव किनाऱ्यावर येताच कुत्रे त्यांच्यामागे धावतात. कुत्र्यांच्या भीतीने कासवे अनेकदा अंडी घालण्यासाठी येत नाहीत. त्यामुळे या किनाऱ्यावर वन कर्मचाऱ्यांना नेमले असून कासव आल्यानंतर काठी घेऊन ते या भटक्या कुत्र्यांना हाकलतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

कणखर गृहमंत्री ते संवेदनशील कृषीमंत्री: रवी नाईक यांच्या व्यक्तिमत्त्वाचं मुख्यमंत्री फडणवीसांकडून गौरवोद्गार

Ravi Naik: 'मी फक्त पुढे, सेनापती मात्र रवीच'; दिवंगत नेत्याला भावनिक आदरांजली

Horoscope: 71 वर्षांनंतर महासंयोग! यंदाची दिवाळी 5 शुभ योगांची, 'या' राशींचे भाग्य उजळणार; शुभ कार्यांसाठी सर्वोत्तम काळ

1310-1312 मध्ये अल्लाउद्दीन खिलजीच्या मोठ्या सैन्याने कोकणात प्रवेश केला, कदंबांची गोव्यातील राजधानी गोपकपट्टणाचा नाश केला..

Mini Narkasur: दिवाळीची लगबग! 'मिनी नरकासुर' विक्रीसाठी सज्ज; किंमत वाचून थक्क व्हाल

SCROLL FOR NEXT