'मुरगाव पालिकेतील 10 वर्षांपूर्वीचे तीन कोटी गायब'

प्रकल्पासाठी राज्य सरकार (government) तर्फे तीन करोड रुपये मंजूर होऊन धनादेश पालिकेकडे आला होता
Margao Municipality
Margao Municipality Dainik Gomantak 
Published on
Updated on

गोव्याच्या सुवर्ण महोत्सवी मुक्ती दिन वर्षानिमित्त राज्य सरकारने एखादा प्रकल्प उभारण्यासाठी मुरगाव पालिकेला 10 वर्षांपूर्वी दिलेले तीन कोटी रुपये गायब करण्यात आल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे. माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या हस्ते मुरगाव नगरपालिकेच्या मुख्याधिकारी बंगल्याच्या जागी सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त प्रकल्पाची पायाभरणी केली होती.

या प्रकल्पाला सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त तीन करोड रुपये मंजूर होऊन धनादेश पालिकेकडे आला होता. मात्र तो धनादेश एका माजी नगराध्यक्षानी आपल्या खाजगी बँकेच्या खात्यात जमा केला होता. यावेळी माजी नगराध्यक्ष तारा केरकर यांनी पालिकेच्या बैठकीत सुवर्णमहोत्सवाची रक्कम पालिकेच्या बँक खात्यात जमा करण्यात यावी यासाठी आवाज उठवला होता. तसेच तीन करोड रुपये कोणत्या माजी नगराध्यक्षानी आपल्या बँक (Bank) खात्यात जमा केले त्याची तक्रार दक्षता विभागात दाखल केली होती.

Margao Municipality
‘उत्पल बाबत योग्य निर्णय घेऊ’

तक्रार झाल्याचे समजतात त्या माजी नगराध्यक्षानी तीन करोड रुपयांचा धनादेश पुन्हा मुरगाव (Mormugao) पालिकेकडे सुपूर्द केला होता. मात्र गेल्या काही दिवसापासून राज्य सरकारने सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त दिलेले तीन करोड रुपये मुरगाव नगरपालिकेच्या तिजोरीतून गायब झाल्याची माहिती मिळताच माजी नगराध्यक्ष तारा केरकर यांनी पुन्हा एकदा दक्षता विभागात तक्रार दाखल करणार असल्याची माहिती दिली आहे.

वास्को (Vasco) स्वतंत्र पथ मार्गाच्या बाजूस असलेल्या मुरगाव नगरपालिकेच्या मुख्याधिकारी बंगल्याच्या जागी सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त प्रकल्पासाठी राज्य सरकार (government) तर्फे तीन करोड रुपये मंजूर होऊन धनादेश पालिकेकडे आला होता. यावेळी एका विद्यमान नगरसेवक तथा माजी नगराध्यक्षानी तीन करोड रुपये बेकायदेशीर रित्या आपल्या खासगी खात्यात बँकेत जमा केले होते. त्यात त्याला सत्ताधारी पालिका मंडळांनी पाठिंबा दर्शवला होता, अशी माहिती तारा केरकर यांनी दिली आहे.

Margao Municipality
परीक्षा ऑफलाइनचं गणवेशाचं बंधन नाही, वेळेतही सवलत

कारण पालिकेचे पैसे नगरसेवक (corporator) किंवा पालिका अधिकारी आपल्या खासगी बँकेत जमा करू शकत नाही. मग त्या माजी नगराध्यक्षानी तीन कोटी बँकेत बेकायदेशीररित्या वास्कोतील एका खासगी बँक खात्यात जमा केले होते. नंतर तारा केरकर यांनी पालिका बैठकीत या पैशाच्या संदर्भात प्रश्न विचारले असता सदर पैसे एका नगरसेवकाने आपल्या खासगी खात्यात बँकेत खात्यात जमा केला असल्याचे कळताच, केरकर यांनी दक्षता विभागात तक्रार दाखल केली होती. तक्रार दाखल केल्याचे समजतात त्या नगरसेवकाने पैसे पुन्हा पालिकेकडे सुपूर्द केले.

राज्य सरकारतर्फे सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त मुरगाव नगरपालिकेला (Municipality) दिलेले तीन करोड रुपये गायब झाल्याची माहिती कळताच, तारा केरकर यांनी पुन्हा एकदा पालिका मंडळावर संशय व्यक्त केला आहे. गेल्या काही दिवसापासून पालिकेच्या कामगारांचे वेतन देण्यास समर्थ नसलेल्या मुरगाव पालिकेतून सुवर्णमहोत्सवाचे तीन करोड रुपये गायब होणे म्हणजे मोठा गुन्हा असून या प्रकरणी लवकरच पुन्हा एकदा दक्षता विभागात तक्रार दाखल करणार असल्याची माहिती माजी नगराध्यक्ष तारा केरकर यांनी दिली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com