Goa Accident Death Dainik Gomantak
गोवा

Goa Accident Death: मृताच्या कुटुंबाला 53.21 लाख भरपाई द्या

Goa Accident Death: मोटार अपघात दावा : लवाद अध्यक्ष शेरीन पॉल यांचा आदेश

दैनिक गोमन्तक

Goa Accident Death: दोन वर्षापूर्वी मेरशी सर्कल येथे महिंद्रा गाडीने पाच वाहनांना धडक देत दुचाकीला धडक दिल्याने त्यावरील मागे बसलेला सहचालक हितेश ऊर्फ हितेशकुमार गणेश राम चौधरी याचा या अपघातात मृत्यू झाला होता.

गाडीच्या चालकाने निष्काळजीपणे वाहन चालविल्याने या प्रकरणी मयताची पत्नी व मुलाला 6 टक्के व्याज दरासह 53 लाख 21 हजार रुपये नुकसान भरपाई देण्याचा आदेश येथील उत्तर गोवा मोटार अपघात दावा लवादाचे अध्यक्ष शेरीन पॉल यांनी दिला आहे.

या अपघातप्रकरणी जुने गोवे पोलिसांनी 29 मार्च 2021 रोजी दाखल केलेल्या अपघाती गुन्ह्यानुसार मेरशी जंक्शन येथे महिंद्रा गाडीने दोन गाड्यांना मागून धडक दिल्यानंतर दुचाकीला मागून धडक दिली होती.

या धडकेने दुचाकीवर मागे बसलेला हितेशकुमार गंभीर जखमी झाला होता व त्याला गोमेकॉ इस्पितळात नेत असताना त्याचा मृत्यू झाला होता.

मयत हितेशकुमार चौधरी याची पत्नी राणी कुमारी ऊर्फ राणीदेवी हितेश चौधरी व 2 महिन्याचे मूल उर्वशी हितेश कुमार चौधरी यांनी नुकसान भरपाईसाठी 50 लाखांचा दावा गोवा मोटार अपघात दावा लवादाकडे दाखल केला होता.

हितेशकुमार हा चौधरी ट्रेडिंग कंपनीत कामाला होता व त्याला दरमहा २५ हजार रुपये वेतन होते. मात्र या नुकसान भरपाईच्या दाव्याला महिंद्रा गाडीचा चालक प्रसाद शेट्टी व मालक जयराम शेट्टी तसेच एचडीएफसी इर्गो जनरल इन्शुरन्स कंपनीने त्याला विरोध केला होता.

या खटल्यावरील सुनावणीवेळी दावा केलेल्या अर्जदार राणी चौधरी यांनी नरेंद्र कुमार, अभय फडते व नरसिराम चौधरी या तिघांना साक्षीदार म्हणून न्यायालयात सादर केले होते. त्यांनी न्यायालयात साक्ष दिली होती.

प्रतिवाद्यांतर्फे कोणीही साक्षीदार सादर केला नव्हता. जुने गोवे पोलिसांनी नोंद केलेल्या या अपघाताच्या गुन्ह्यात महिंद्रा गाडीच्या चालकाने भरधाव वेगाने वाहन हाकून अगोदर पुढे असलेल्या दोन गाड्यांना धडक दिली व त्यानंतर या गाड्याच्या पुढे असलेल्या दुचाकीला धडक दिली होती.

त्यामुळे मागे बसलेला हितेशकुमार चौधरी गंभीर जखमी होऊन त्याचे गोमेकॉ इस्पितळात उपचारादरम्यान काही वेळातच मृत्यू झाला होता. महिंद्रा गाडीने या अपघातावेळी पाच वाहनांना धडक दिल्याने गाडीच्या वेगाची कल्पना येऊ शकते, असे निरीक्षण लवादाने नोंदवले.

हितेशकुमार याचा मृत्यू झाला तेव्हा तो 26 वर्षाचा होता. त्यामुळे त्याची नोकरीची उर्वरित वर्षे याचा विचार केल्यास 50 टक्क्यांनुसार किमान 17 वर्षांची नुकसानभरपाई त्याला मिळणे आवश्‍यक आहे.

या प्रकरणी लवादाने साक्षीदारांच्या जबाबाची घेत व सर्वोच्च न्यायालयाने अपघाती मृत्यू संदर्भातील दिलेल्या विविध खटल्यांच्या निवाड्यांची दखल घेत राणी चौधरी व मुलाला दावा अर्ज सादर केल्यापासून 6 टक्के व्याजदरासह 53 लाख 21 हजार रुपयांची नुकसान भरपाई देण्याचा आदेश जारी केला. वरील रक्कम तिन्ही प्रतिवादींनी संयुक्तपणे लवादाच्या खात्यात जमा करण्याचा आदेश लवादाने दिला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Water Crisis: गोव्यात पावसाची विक्रमी तूट, तापमान 37 अंशांपार! आगामी उन्हाळ्यात पाणीटंचाईचे संकट?

Mumbai Indians Captaincy: रोहित शर्माला पुन्हा कॅप्टन बनवण्याच्या बातम्या अफवाच, एमआयने कर्णधारपदाबाबत स्पष्टचं सांगितलं; समोर आली महत्त्वाची माहिती

Goa Undeclared Assets: गोव्यातील 1200 लोकप्रतिनिधींची नावे जाहीर! मालमत्तेचे विवरणपत्र न दिल्याने लोकायुक्तांची कारवाई

Goa Waste Management: साळगावचा कचरा प्रकल्प 25 दिवस बंद! उत्तर गोव्यात कचरा व्यवस्थापनाचे मोठे आव्हान

Saudi Aramco Missile Attack: जगातील सर्वात मोठ्या तेल कंपनीवर मिसाइल हल्ला, क्राउन प्रिन्सच्या इशाऱ्यानंतर हूतींची काही तासांतच दुप्पट वेगाने कारवाई VIDEO

SCROLL FOR NEXT