Goa Traffic Rules: 8 महिन्यांत 3400 चालक परवाने निलंबित

Goa Traffic Rules: मडगाव आरटीओ कार्यालयाची कारवाई : रोज किमान 15 जणांवर टाच
Goa Traffic Rules
Goa Traffic RulesDainik Gomantak
Published on
Updated on

Goa Traffic Rules: वाहतूक नियम मोडणाऱ्यांच्‍या विरोधात नवीन नियमांत कडक कारवाई करण्‍यात येत असली तरी वाहन चालकांना अजूनही अपेक्षित शिस्‍त आलेली नाही, हे गेल्या आठ महिन्‍यांतील आकडेवारीवरुन दिसून आले आहे.

Goa Traffic Rules
MLA Jeet Arolkar: जमीन रूपांतरणाविरोधात पेडणेकरांचा एल्गार

वाहतूक नियम मोडणाऱ्या वाहन चालकांचे दररोज किमान 15 वाहतूक परवाने आरटीओच्‍या मडगाव कार्यालयाकडून निलंबित करण्‍यात येत असून जानेवारी ते ऑगस्‍ट या आठ महिन्‍यात तब्‍बल 3418 वाहन चालकांचे परवाने निलंबित केल्‍याची माहिती उपलब्‍ध झाली आहे.

दक्षिण गोव्‍यातील वेगवेगळ्‍या वाहतूक पोलिस विभागांकडून आलेल्‍या शिफारसीनुसार ही कारवाई केली जात असून दर दिवसाला परवाने निलंबित करण्‍याच्‍या 15 ते 20 शिफारसी येत असतात. यात मद्य पिऊन वाहन चालविणे, सिग्‍नल्‍स मोडणे, वेगाने वाहन चालविणे या गुन्‍ह्यांचा समावेश आहे.

Goa Traffic Rules
Bicholim Market: डिचोली बाजारातील अतिक्रमणे हटविणार

ऑगस्टपर्यंत 4867 चालकांवर गुन्हा

जानेवारी ते आॅगस्‍ट या पहिल्‍या अाठ महिन्‍यात मडगाव वाहतूक पोलिसांनी एकूण 4867 वाहन चालकांविरोधात गुन्‍हा नोंद केला असून त्‍यातील 2460 चालक हेल्‍मेटशिवाय दुचाकी चालविणारे आहेत. 1327 जणांविरोधात अतिवेगाने वाहन चालविण्‍याचा गुन्‍हा नोंद झाला आहे.

184 वाहन चालकांविरोधात दारु पिऊन वाहन चालविणे तर 337 जणांवर वाहन चालविताना मोबाईलचा वापर केल्‍याप्रकरणी गुन्‍हा नोंद झाला आहे,अशी माहिती उपलब्‍ध झाली आहे. सध्‍या चालू असलेल्‍या रस्‍ता सुरक्षा सप्‍ताहानिमित्ताने मडगावसह सर्व वाहतूक पोलिसांनी वाहन चालकांमध्‍ये जागृतीची मोहीम सुरु केली असून यासाठी विविध शाळांच्‍या विद्यार्थ्‍यांची मदत घेतली जात आहे.

सर्वाधिक शिफारशी मडगाव पोलिसांकडून

पहिल्‍या अाठ महिन्‍यात वाहन परवाने निलंबित करण्‍याच्‍या सर्वांत जास्‍त म्‍हणजे 2302 शिफारशी मडगाव वाहतूक पोलिसांकडून आल्‍या असून त्‍यानंतर वास्‍को पोलिसांकडून अशा ६०२ शिफारसी आल्‍या आहेत.

कोलवा पोलिसांकडून २७८, केपे पोलिसांकडून २०९ तर पणजी पोलिसांकडून अशा 27 शिफारसी आल्‍या आहेत. यात ६० ते ७० टक्‍के शिफारशी हेल्‍मेटशिवाय वाहन चालविणाऱ्या चालकांविरोधात असल्‍याची माहिती आरटीओ कार्यालयातील अधिकाऱ्यांनी दिली. त्‍या पाठोपाठ अतिवेगाने वाहने हाकने आणि दारु पिऊन वाहन चालविणे या गुन्‍ह्यांचा समावेश असल्‍याचे त्‍यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com