Calangute  Dainik Gomantak
गोवा

Calangute News : ‘रमा’च्‍या आमिषाला भुलला, दोघांनी लुटला; संशयितांना अटक

गोमन्तक डिजिटल टीम

Calangute News :

कळंगुट ‘लडकी चाहिए क्या’ असे म्हणत पर्यटकांना लुटण्याचे प्रकार राज्यात दिवसेंदिवस वाढतच चालले आहेत. कळंगुट येथे भाविनकुमार पटेल या गुजराती पर्यटकाला तरुणीचे आमिष दाखवून ४४ हजारांना लुबाडल्याची घटना समोर आली. मात्र, पाेलिसांनी गतीने सूत्रे फिरविल्याने संशयित त्वरित हाती लागले.

पोलिसांनी रविवारी सायंकाळी खंडणी आणि फसवणूकप्रकरणी वरुण प्रजापती आणि चंदन घडाई या दोघांवर गुन्हा नोंदवून त्यांना अटक केली. कारवाईचा बडगा उगारताच संशयितांनी पीडित भाविनकुमार पटेल याचे पैसेही परत दिले आहेत.

भाविनकुमार पटेल हा गुजराती पर्यटक शुक्रवारी संध्याकाळी कळंगुटमधील एका हॉटेलात उतरला होता. दुसऱ्या दिवशी (शनिवारी) सकाळी किनारी भागात फिरून आल्यावर राहत्या हॉटेलकडे जात असता दोघा अनोळखी तरुणांनी (दलालांनी) त्याचा पाठलाग केला आणि तरुणीचे आमिष दाखवून जवळच्या एका कॅफेमध्ये घेऊन गेले.

यावेळी त्याला जीवे मारण्याची धमकी दिल्याने पोलिसांत तक्रार करण्याचे धारिष्ट्य झाले नाही, असे सांगत पटेल याने निराश मनाने गुजरातला जाण्याचा निर्णय घेतला. मात्र, तत्पूर्वी त्याने स्थानिक प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींकडे आपली कैफियत मांडली आणि असे प्रकार रोखण्याचे आवाहन पोलिसांना केले.

माझ्याच पैशाने मद्यपान केल्यानंतर त्या तरुणीने चार हजार रुपये काढून घेतले. तसेच ‘चालता हो इथून’ असे सांगत मला जीवे मारण्याची धमकी दिली. त्यामुळे मी माझी कशीबशी सुटका करून घेऊन तेथून पळालो आणि राहते हॉटेल गाठले.

माझ्या बाबतीत घडलेली घटना हॉटेलमधील कर्मचाऱ्यांना सांगितली असता, गोव्यात असे प्रकार नेहमीच घडत असतात. त्यामुळे झाले गेले विसरून सुखरूप घरी जा असा सल्ला त्यांनी दिला, असे भाविनकुमार पटेल यांनी डोळ्यांत अश्रू आणून सांगितले.

संगनमताने लुटालूट

यावेळी कॅफेमधील काउंटरवर वीस हजार रुपये डिपॉझिट करण्याची त्याला सक्ती करण्यात आली, मगच आत प्रवेश देण्यात आला. यावेळी एक तरुणी त्याच्यासमोर येऊन बसली. मागेपुढे न पाहाता त्या तरुणीने भरपूर महागडे मद्य प्राशन केले. त्या बदल्यात काऊंटरवरील कर्मचाऱ्याने माझ्याकडून आणखी वीस हजार रुपये घेतले, असे पटेल यांनी सांगितले. यातून तेथील कर्मचाऱ्यांची मिलीभगत असल्याचे लक्षात आले, असे तो म्हणाला.

जी व्यक्ती वेश्या व्यवसायासारख्या लैंगिक क्रियाकलापांमध्ये भाग घेते, त्यावेळी सेवा विकत घेतल्याबद्दल ती व्यक्तीही दोषी ठरते. लैंगिक सेवा घेण्यासाठी पैसे खर्च करणारा ग्राहक आणि पैशांच्या बदल्यात ग्राहकाला महिला पुरविणारा पुरवठादार या दोघांवरही अनैतिक तस्करी प्रतिबंध कायदा, १९५६ अंतर्गत गुन्हा दाखल करणे आवश्यक आहे.

- अरुणकुमार पांडे, संस्थापक सदस्य, अर्ज.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crime News: गोव्यातील धक्कादायक प्रकार! एका भावाकडून दुसऱ्या भावाच्या होणाऱ्या बायकोचा लैंगिक छळ

Mhadei Water Dispute: ‘म्‍हादई’च्‍या मुद्यावरून काँग्रेस व भाजपमध्‍ये 'तू तू - मैं मैं'

Rarest Birds in World: जगातील 'हे' दुर्मिळ पक्षी नामशेष होण्याच्या वाटेवर; जाणून घ्या

२१ कुटुंबे नव्या घरात करणार गणरायाचे स्वागत! राणे दाम्पत्यामुळे गणेशोत्सव ठरणार खास

भारतीयांना दिवसाला प्राप्त होतात 12 फसवे मेसेज; आतापर्यंत 93,000 हून अधिक टेलिकॉम स्कॅम!

SCROLL FOR NEXT