Jetty In Goa : शापोरा जेटीशी निगडीत मच्छिमारांचे दरवर्षी लाखो रुपयांचे होतेय नुकसान ; बलभीम मालवणकर यांचा दावा

Jetty In Goa : सरकारने गोमंतकीय मच्छिमारांच्या समस्यांवर तोडग्यासाठी तातडीने पावले उचलावीत
jetty
jettyDainik Gomantak

Jetty In Goa :

शिवोली, एक जून ते ३१ जुलै अशी दोन महिने मासेमारी बंदी असते. मात्र, शापोरा जेटीशी संबंधित मच्छीमार, फिशींग ट्रॉलर्सवाल्यांसाठी हाच बंदीचा काळ चार महिन्यांहून अधिक असतो. मच्छिमारांचे लाखोंचे नुकसान होते,असे शापोरा बोट असोशिएशनचे चेअरमन बलभीम मालवणकर यांनी सांगितले.

अगदी पोर्तुगीज काळापासून मासेमारीसाठी कार्यरत असलेल्या येथील जेटीवर एकेकाळी तीनशेहून अधिक फिशींग ट्रॉलर्स मासेमारीसाठी समुद्रात सोडले जायचे. परंतु काळानुसार येथील जेटीशी संबंधितांना सॅंड-बारच्या समस्यांचा विळखा वाढत गेल्याने आजघडीला पन्नासहून कमी फिशींग ट्रॉलर्स याभागात दिसून येतात.

‘नेमेचि येतो पावसाळा’ या उक्तीप्रमाणे सरकारे येतात- जातात, स्थानिक मच्छीमारांना मोठमोठी आश्वासने दिली जातात. परंतु शापोरातील मच्छीमारांची मासेमारी संदर्भात गेली कित्येक वर्षे चाललेली फरफट आणि वणवण अद्याप संपण्याची चिन्हे दिसेनात, असे मालवणकर यांनी सांगितले.

jetty
Goa School Reopening: 'इगो' बाजुला ठेवा! शाळा उशिराने सुरु करण्याबाबत दुर्गादासांची मुख्यमंत्र्यांना पुन्हा विनंत

याबाबत स्थानिक व्यावसायिक वांटू गोवेकर यांनी सांगितले,की स्थानिक मच्छिमार बांधवांना दरवर्षी या सँड बारच्या समस्येमुळे त्रास सोसावा लागतो. परिणामी लाखो रुपयांचे नुकसानही सोसावे लागते. सरकारने गोमंतकीय मच्छिमारांच्या समस्यांवर तोडग्यासाठी तातडीने पावले उचलावीत. मासेमारी बंदीच्या काळानंतरही मासेमारी बंदी आम्हा व्यावसायिकांना पहावी लागते. सरकारने या स्थितीची दखल घ्यावी.

कोट्यवधींचा निधी; कृती मात्र नाही !

शापोरा समुद्रात निर्माण होणाऱ्या सॅंड बारचा प्रश्न सोडविण्यासाठी कोट्यवधींचा निधी मंजूर झाल्याची माहिती संबंधित मंत्र्यांकडून स्थानिक मच्छीमारांना वारंवार दिली जाते. परंतु अद्याप याभागात त्यासाठी काहीच हालचाल झाल्याचे आठवत नाही. राज्याचे विद्यमान मत्स्योद्योग मंत्री स्वतः या व्यवसायाशी निगडीत असल्याने निदान आतातरी या भागातील ‘सॅंड बार’चा प्रश्न ते प्रामुख्याने सोडवतील, अशी आशा असून अन्यथा पूर्वजांचा हा पारंपरिक व्यवसाय सोडून देण्याची पाळी शापोरातील मच्छीमार बांधवावर आली असल्याचे मालवणकर यांनी सांगितले.

jetty
Goa Fishing Ban: एक जूनपासून मासेमारीस बंदी, पारंपारिक मच्छीमारांची आवराआवर सुरू

शापोरातील मच्छिमार कंगाल अवस्थेत!

यंदाच्या हंगामात आतापर्यंत केवळ दोनच महिने मासेमारी करण्याचे भाग्य लाभले. परंतु परप्रांतीय कामगार तसेच इतर गोष्टींचा विचार केल्यास स्थानिक मच्छीमार आर्थिकदृष्ट्या कंगाल अवस्थेतच आहेत. मासेमारीवेळी समुद्रात निर्माण होणाऱ्या वाळूच्या टेकड्यांवर आदळून बिघडलेल्या अनेक बोटी नादुरुस्त अवस्थेत येतात. इतकेच नव्हे तर खलाशी- कामगारांना पगार देण्याइतपत मच्छिमारांची अर्थस्थिती राहिली नाही, असे व्यावसायिक रमेश उर्फ वांटू गोवेकर या व्यावसायिकाने सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com