Vasco Traffic Police Dainik Gomantak
गोवा

Goa Traffic Police: 4.39 लाख चालकांना दंड, 25.65 कोटींचा महसूल जमा

Goa Traffic Police: दंड वाढला, पण नियम उल्लंघनही वाढले

Shreya Dewalkar

Goa Traffic Police: वाहतूक नियमांच्या उल्लंघनामुळे रस्ता अपघाताचे प्रमाण वाढत असल्याने दंडात्मक कारवाई कायद्यात दुरुस्ती करून दंडाच्या रक्कमेत वाढ करण्यात आली.

मात्र, वाहतूक नियमांच्या उल्लंघनाचे प्रमाण कमी होण्याऐवजी दिवसेंदिवस वाढतच आहे.

यावर्षी ऑक्टोबरपर्यंत राज्यात 4.39 लाख वाहनचालकांना चलन (दंड) देऊन 25.65 कोटी रुपये महसूल जमा झाला आहे.

गेल्यावर्षीच्या तुलनेत वाहतूक पोलिसांनी केलेल्या कारवाईत 2.87 टक्के, तर महसुलात 60.73 टक्के वाढ झाली आहे. सरासरी दंडात्मक कारवाईतून प्रतिमाह 2.5 कोटींचा महसूल जमा होत आहे.

नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी सर्वाधिक प्रकरणे धोकादायक पार्किंगची नोंद झाली आहेत. या कारवाईत ७४,५३० जणांकडून ३.७५ कोटी, तर हेल्मेट परिधान न केल्यामुळे ३१,९५० जणांकडून ३.२५ कोटी रुपये दंड वसूल केला आहे.

१,४६२ मद्यपी चालकांवर कारवाई करण्यात आली आहे, तर १२ अल्पवयीन मुलांनी वाहन चालविल्यामुळे त्यांच्या पालकांकडून ८५,५०० रुपये दंड वसूल केला आहे.

यावर्षी १० महिन्यांत वाहतूक नियम उल्लंघन केल्यामुळे ४,३८,९८९ वाहनचालकांकडून २५ कोटी ६५ लाख ३७ हजार ५०० रुपये दंड वसूल केला आहे, तर २०२२ च्या वरील कालावधीत ४,२६,७३९ वाहनचालकांकडून १५ कोटी ९६ लाख २ हजार ८०० रुपये दंड वसूल केला होता.

वाहतूक नियमांच्या उल्लंघनामुळे रस्ता अपघाताचे प्रमाण वाढत असल्याने दंडात्मक कारवाई कायद्यात दुरुस्ती करून दंडाच्या रक्कमेत वाढ करण्यात आली.

मात्र, वाहतूक नियमांच्या उल्लंघनाचे प्रमाण कमी होण्याऐवजी दिवसेंदिवस वाढतच आहे. यावर्षी ऑक्टोबरपर्यंत राज्यात ४.३९ लाख वाहनचालकांना चलन (दंड) देऊन २५.६५ कोटी रुपये महसूल जमा झाला आहे.

गेल्यावर्षीच्या तुलनेत वाहतूक पोलिसांनी केलेल्या कारवाईत २.८७ टक्के, तर महसुलात ६०.७३ टक्के वाढ झाली आहे. सरासरी दंडात्मक कारवाईतून प्रतिमाह २.५ कोटींचा महसूल जमा होत आहे.

नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी सर्वाधिक प्रकरणे धोकादायक पार्किंगची नोंद झाली आहेत. या कारवाईत ७४,५३० जणांकडून ३.७५ कोटी, तर हेल्मेट परिधान न केल्यामुळे ३१,९५० जणांकडून ३.२५ कोटी रुपये दंड वसूल केला आहे.

१,४६२ मद्यपी चालकांवर कारवाई करण्यात आली आहे, तर १२ अल्पवयीन मुलांनी वाहन चालविल्यामुळे त्यांच्या पालकांकडून ८५,५०० रुपये दंड वसूल केला आहे.

यावर्षी १० महिन्यांत वाहतूक नियम उल्लंघन केल्यामुळे ४,३८,९८९ वाहनचालकांकडून २५ कोटी ६५ लाख ३७ हजार ५०० रुपये दंड वसूल केला आहे, तर २०२२ च्या वरील कालावधीत ४,२६,७३९ वाहनचालकांकडून १५ कोटी ९६ लाख २ हजार ८०० रुपये दंड वसूल केला होता.

नियम उल्लंघन प्रकरणे दंड वसूल रु.

  • धोकादायक पार्किंग ७४,५३० ३,७५,०४,१००

  • हेल्मेट न वापरणे ३१,९५० ३,२५,६६,०००

  • नो एन्ट्री ५३,५६१ २,७३,५८,०००

  • काळ्या काचा ५१,३२५ २,६०,६७,५००

  • भरधाववेग १०,१६८ १,०३,१४,०००

  • नो पार्किंग १६,६६८ ८३,७४,५००

  • सीट बेल्टविना ७,५५८ ७६,३२,०००

  • मोबाईल वापरणे ४,३१६ ४९,६९,०००

  • अनधिकृत पार्किंग ९,१८७ ४५,९७,०००.

  • अल्पवयीन चालक १२ ८५,५००

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Helicopter Crash: फ्रान्समध्ये थरार! आग विझवणाऱ्या हेलिकॉप्टरचे तलावात क्रॅश लँडिंग; सुदैवाने जीवितहानी टळली Watch Video

Money Laundering Case: धर्मांतरण रॅकेटचा मास्टरमाइंड छंगूर बाबाच्या साम्राज्यावर ईडीचा घाला! मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी 13 कोटींची मालमत्ता जप्त

Viral Video: चांगलीच खोड मोडली! जिवंत कोळंबी खाण्याचा प्रयत्न करणाऱ्या पोरीचा व्हिडिओ व्हायरल; नेटकऱ्यांनी उठवली टीकेची झोड

Ro-Ro Car Train Service: गणेशोत्सवापूर्वी कोकण रेल्वेची पहिली रो-रो कार ट्रेन गोव्यात दाखल, जाणून घ्या भाडे?

Porvorim: ओ कोकेरो ते मॉल दी गोवा रस्ता 5 दिवसांच्या गणेश चतुर्थीनंतरच होणार बंद; CM सावंतांनी केले स्पष्ट

SCROLL FOR NEXT