Goa Crime News Dainik Gomantak
गोवा

चार वर्षांनी वडिलांनी 'परत येतोय' असा फोन केला, 12 वर्षांची मुलगी घाबरली; आईला म्हणाली, 'बाबांनी माझ्यावर...'

गोमन्तक डिजिटल टीम

मडगाव येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. बापानेच पोटच्या मुलीवर सलग चार वर्षे अत्याचार केल्याचे उघडकीस आले आहे. सतत भीतीच्या सावटाखाली असलेल्या मुलीने याबाबत चार वर्षे कुठेच वाच्यता केली नाही.

दरम्यान, गावाकडे गेलेला नराधम बाब पुन्हा येणार असे समजताच घाबरलेल्या 12 वर्षीय मुलीने तिच्यासोबत घडलेला सर्व प्रकार आपल्या आईला सांगितला.

संशयित आरोपी हमाली करणारा कामगार असून तो आपले घर सोडून आपल्या मुळ गावात गेला होता. आता तो परत आपल्या घरी येऊ पाहात होता. पण बाप घरी आल्यास आपल्याला पुन्हा त्याच्या वासनेची शिकार व्हावे लागणार याची भीती असल्याने त्याच्या मुलीने त्याला परत घरात घेण्यास कडाडून विरोध केला. आणि चार वर्षांपूर्वीचा त्याचा हा अनानुष प्रकार उघडकीस आला.

चार वर्षांपूर्वी हे परप्रांतीय कुटुंब मडगाव येथे रहात होते. त्यावेळी त्या नराधमाने आपल्याच १२ वर्षीय मुलीला कित्येकदा आपल्या वासनेची शिकार बनविले मात्र त्याने तिला धमकी दिल्याने तीने त्याची वाच्यता केली नव्हती.

लॉकडाऊनच्या काळात तो आपल्या कुटुंबाला येथेच सोडून स्वतः आपल्या कर्नाटक राज्यातील गावी गेला. मागची चार वर्षे तो आपल्या मडगाव येथील कुटुंबाकडे आलाच नव्हता.

पण काही दिवसापूर्वी त्याने आपल्या पत्नीशी संपर्क करून आपण घरी परत येतो असे सांगितले होते. ही गोष्ट तिने आपल्या मुलीच्या कानावर घातल्यावर मुलीने बापाला परत घरात घेण्यास कडाडून विरोध केला. याचे कारण तिला आईने खोदून खोदून विचारल्यावर तिने चार वर्षापूर्वी आपल्यावर आलेला प्रसंग तिला कथन केला. त्यानंतर याची वर्दी पोलीसांना दिल्यावर पोलिसांनी त्या नराधमाला अटक केली.

दरम्यान या संशयिताने कर्नाटक येथेही आणखी एका अल्पवयीन मुलीवर अशीच बळजबरी केल्याचा प्रकार उघडकीस आला असून पोलीस त्याही घटनेचा तपास करत आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Subhash Velingkar: सुभाष वेलिंगकरांची अटक अटळ? कोर्टाचा दिलासा नाही, जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी

Saint Francis Xavier: सुभाष वेलिंगकरांच्या अटकेसाठी उद्रेक; पर्यटक, विद्यार्थ्यांचे हाल, गोव्यात दिवसभर कुठे काय घडलं?

BKC ते आरे JVLR पंतप्रधान मोदींचा मेट्रोने प्रवास; शाळकरी विद्यार्थी, महिलांशी साधला संवाद पाहा Video

Goa HSE Board Exam: गोवा बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, JEE परीक्षेमुळे मोठा निर्णय

गिरीत बंदिस्त खोलीत आढळला मृतदेह , संशयास्पद मृत्यूचा कुटुंबियांचा अंदाज; गोव्यातील ठळक बातम्या

SCROLL FOR NEXT