Goa Indore: दाल में कुछ काला है! इंदूरहून गोव्याला पाठवलेली डाळीची पोती ड्राव्हरने केली गायब

ऑर्डर मिळाल्यानंतर व्यावसायिकाने ट्रकद्वारे गोव्याला डाळीचे पोती पाठवली, पण ट्रकचालकाने त्यातील काही पोती अर्ध्या रस्त्यात गायब केल्याची माहिती समोर आली आहे.
Goa Indore
Goa IndoreDainik Gomantak
Published on
Updated on

Goa Indore: इंदूरहून गोव्याला पाठवलेली डाळीची पोती ड्राव्हरने गायब केली आहेत. इंदूरमधील एका व्यावसायिकाला गोव्यातून डाळीची ऑर्डर मिळाली. ऑर्डर मिळाल्यानंतर व्यावसायिकाने ट्रकद्वारे गोव्याला डाळीचे पोती पाठवली, पण ट्रकचालकाने त्यातील काही पोती अर्ध्या रस्त्यात गायब केल्याची माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, इंदूरहून गोव्याला डाळीची 300 पोती पाठवण्यात आली. दरम्यान, ज्यावेळी ट्रक गोव्यात पोहचला तेव्हा त्यापैकी 30 पोती गायब अल्याचे समोर आले. गोव्यातील व्यक्तीने इंदूर येथील व्यावसायिकाला याबाबत माहिती दिली.

दरम्यान, त्यानंतर वाहतूक व्यावसायिकाने चालकावर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. इंदूर येथील भंवरकुआन पोलीस ठाण्यात याप्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली आहे.

Goa Indore
Mumbai Goa Flight: मुंबई - गोवा विमानाचा प्रवास केवळ 85 रुपयांत? व्हायरल होतेय एअर इंडियाचे तिकीट

भंवरकुआन पोलिस स्टेशन हद्दीतील पालडा येथे ट्रान्सपोर्टचा व्यवसाय आहे. काही दिवसांपूर्वी त्यांना गोव्यात डाळीची पोती पाठवण्याची ऑर्डर मिळाली होती. इंदूरहून सतीश बन्सल यांनी सुमारे 300 पोती गोव्याला पाठवली. परंतु गोव्यात पोहोचेपर्यंत त्यापैकी 30 पोती कमी झाली होती. अशी माहिती अतिरिक्त एसीपी अभिनय विश्वकर्मा यांनी दिली.

एकूण 80 लाख रुपयांची डाळ गोव्यात पाठवण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र वाटेत आरोपींनी 80 हजार रुपये किमतीची डाळ गायब केली. वाहतूक व्यावसायिकाला याची माहिती मिळताच त्यांनी चालक गोपाल जयस्वाल याच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com