400 Multitask employees at Goa medical college hospital have not been paid for past 5 months  Dainik Gomantak
गोवा

Goa: ‘भाजपने केला कोविड योद्ध्यांचा विश्वासघात’

‘गोमेकॉ’तील 400 मल्‍टिटास्क कर्मचाऱ्यांवर अन्‍याय : पाच महिन्यांपासून वेतन नाही

दैनिक गोमन्तक

पणजी: राज्यातील (Goa) भाजप सरकारने (BJP Government) कोविड योद्ध्यांचा (Covid Warriors) विश्वासघात केल्‍याचे सांगून आम आदमी पक्षाने (AAP) राज्य सरकारचा तीव्र शब्दांत निषेध केला. गोमेकॉमधील 400 मल्‍टिटास्क कर्मचाऱ्यांना मागील 5 महिन्यांपासून वेतन मिळाले नसल्याचे समोर आले आहे. गोवेकरांना दहा हजार नोकऱ्यांचे आश्वासन देणारा भाजप 400 कर्मचाऱ्यांना त्यांचा पगार वेळेवर देऊ शकत नाही का? असा सवाल आम आदमी पक्षाने उपस्थित केला.

महामारीच्या काळात 400 गोमंतकीयांना शासनाने मल्‍टिटास्किंग कर्मचारी म्हणून नियुक्त केले होते. स्वतःच्या जीवाची पर्वा न करता हे लोक पुढे आले होते आणि त्यांनी गोव्याला कोविडच्या तावडीतून मुक्त करण्याचे मोलाचे योगदान दिले. त्याच्‍याप्रती सरकारची ही अनास्था निषेधार्य असल्याचे आम आदमी पक्षाच्यावतीने सांगण्‍यात आले.

कोविड महामारीच्‍या पहिल्‍या व दुसऱ्या लाटेवेळी कोरोना योद्ध्यांनी जीवाची पर्वा न करता रुग्‍णांची सेवा केली आहे. मात्र, सरकारने त्‍यांना वेळेवर पगार न देता दुर्लक्षित करून एकप्रकारे अन्‍यायच केल्‍याची टीका आपने केली आहे.

सरकारचे सर्वकाही मृगजळ...

कोविड पॉझिटिव्हिटी रेटसह गोवा हे जगातील सर्वांत जास्त प्रभावित ठिकाणांपैकी एक असताना आज दुसऱ्या लाटेनंतर आघाडीच्या योद्ध्यांना सावंत सरकार पूर्णपणे दुर्लक्ष करत आहे. भाजपकडून अनेकदा अशा योद्ध्यांचा सन्मान करून एक दिखावा केला जातो, अशी टीका आपने केली.

अलीकडेच गोव्यात गणेश चतुर्थी मोठ्या थाटामाटात साजरी करण्यात आली, परंतु या कामगारांना त्यांच्या हृदयाच्या जवळचा सण साजरा करण्यासाठी पैसे उधार घ्यावे लागले. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखालील सरकार किती कठोर बनले असून आगामी विधानसभा निवडणुकीत त्यांना घरचा रस्ता दाखवला जाईल, अशी टीका करण्यात आली. या प्रकरणी आप चे नेते डॉ. विभास प्रभुदेसाई यांनी सरकारच्या धोरणाचा निषेध केला.

गोव्याच्या कोविड योद्ध्यांना चतुर्थीच्या उत्सवासाठी पैसे उधार घ्यावे लागतात, हे ऐकून मोठा धक्का बसला. मुख्‍यमंत्री प्रमोद सावंत यांनी थकित वेतन त्वरित द्यावे, अशी मागणी आपचे गोव्याचे संयोजक राहुल म्हांब्रे यांनी केली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cash For Job Scam: वकिलांनाही पूजानं घातला लाखोंचा गंडा; मामलेदाराच्या नोकरीचं दिलं आमिष

Goa News Updates: कळंगुटमध्ये एफडीएची धडक कारवाई, निकृष्ट काजू जप्त; वाचा दिवसभरातील घडामोडी

Vibrant Goa Summit 2024 ला मुख्यमंत्र्यांची हजेरी; पर्यटनाव्यतिरिक्त इतर व्यवसायांवर लक्ष केंद्रित करण्याचा मानस

'Heritage First Festival' मध्ये पदभ्रमण आणि कार्यशाळांची मेजवानी! सहभागी होण्यासाठी 'क्लिक' करा इथे

Goa Tourism: परदेशी की भारतीय? कोणत्या पर्यटकांमुळे होतोय फायदा, व्यावसायिकांनी दिलेलं उत्तर वाचा

SCROLL FOR NEXT