Goa: राज्यात 'पोषण माह' उपक्रम संपन्न

उपक्रमा अंतर्गत महिलांमध्ये आरोग्यविषयक तसेच उपजत गुणांसंबंधी जागृती 
रुमडामळ, दवर्ली येथील कार्यक्रमात मार्गदर्शन करताना महिला व बाल विकास खात्याच्या संचालिका दिपाली नाईक. सोबत इतर मान्यवर (Goa)
रुमडामळ, दवर्ली येथील कार्यक्रमात मार्गदर्शन करताना महिला व बाल विकास खात्याच्या संचालिका दिपाली नाईक. सोबत इतर मान्यवर (Goa)Dainik Gomantak

राज्यात 1 ते 30 सप्टेंबर 2021 या एका महिन्याच्या काळात महिलांसाठी पोषण माह (Poshan Mah), हा उपक्रम राबविला जात आहे. या उपक्रमा अंतर्गत गोव्याच्या (Goa) विविध भागांमध्ये खास करुन ग्रामिण भागांमध्ये महिलांमध्ये आरोग्यविषयक व उपजत गुणांसंबंधी जागृती करण्यात येत आहे. हा कार्यक्रम अंगणवाडी (Anganwadi) तर्फे आयोजित केला जातो. ग्रामिण भागांमधील महिलांना आरोग्य, आहार या विषयी प्रबोधन केले जात आहे, अशी माहिती महिला व बाल कल्याण खात्याच्या संचालिका दिपाली नाईक (Director of Women and Child Welfare Department Deepali Naik) यानी या प्रतिनिधीला सांगितले.

रुमडामळ, दवर्ली येथील कार्यक्रमात मार्गदर्शन करताना महिला व बाल विकास खात्याच्या संचालिका दिपाली नाईक. सोबत इतर मान्यवर (Goa)
पेडणे नगरपालिका क्षेत्रातून प्रचारास सुरुवात; पहा व्हिडिओ

हल्लीच रुमडामळ, दवर्ली येथील स्वामी समर्थ मठामध्ये सार्वजनिक गणपती उत्सवादरम्यान कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमात अंगणवाडी कर्मचारी व मुख्य सेविका सहभागी झाल्या होत्या. या कार्यक्रमात प्रबोधनाव्यतिरिक्त फुगडी कार्यक्रमही आयोजित करण्यात आला. हा कार्यक्रम यशस्वी करण्यात स्थनिक सरपंच, उपसरपंच व पंच शिवाय स्वामी समर्थ मंदिर समितीचे पदाधिकारी यांचे उत्तम सहकार्य लाभले असे नाईक यानी सांगितले. त्यापुर्वी मडगावच्या दक्षिण गोवा जिल्हाधिकारी कचेरीतील कर्मचाऱ्यासाठी योगा व व्यायाम प्रात्यक्षिकाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. अशा प्रकारचे कार्यक्रम कुळे, धारबांदोडा, सांगे येथेही आयोजित करण्यात आले. तेथे फुगडी  व इतर मनोरंजनात्मक कार्यक्रम आयोजित करुन महिलांच्या उपजत गुणांना वाव देण्यात आला, असेही नाईक यानी सांगितले.

रुमडामळ, दवर्ली येथील कार्यक्रमात मार्गदर्शन करताना महिला व बाल विकास खात्याच्या संचालिका दिपाली नाईक. सोबत इतर मान्यवर (Goa)
Goa: प्रकल्प सुरू झाल्यानंतर विरोध मावळेल!

पोषण माह उपक्रमाची सांगता 29 सप्टेंबर रोजी होणार असुन समारोप सोहळा पणजीत आयोजित करण्यात आला आहे. तरी 30 रोजी हात धुण्याचे महत्व, वैयक्तिक स्वच्छता, कचरा व्यवस्थापन कार्यशाळा, असे कार्यक्रम आयोजित केले आहे. स्वच्छता,पोषण व किचन गार्डनसंबंधी मार्गदर्शन, पोषण वाटीका स्पर्धा, घोषणा वाक्य लिहिण्याची स्पर्धा, गरोदर महिलांसाठी पोषण आहारा संबंधी माहिती व मार्गदर्शन, प्रशिक्षण, रांगोळी स्पर्धा, प्रशिक्षण, नुत्री थाळी तयार करण्याचे प्रशिक्षण, फॅन्सी ड्रेस स्पर्धा असे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले अशी पोषण माह उपक्रमा अंतर्गत आयोजित केलेल्या विविध कार्यक्रमाची माहिती नाईक यानी दिली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com