4 year old boy dies in Bicholim after bullet fired from service pistol  Dainik Gomantak
गोवा

सर्व्हिस पिस्तुलातून सुटलेली गोळीने घेतला 4 वर्षीय बालकाचा बळी

दैनिक गोमन्तक

डिचोली: सर्व्हिस पिस्तुलातून अचानक सुटलेली गोळी तोंडात घुसल्याने एका चार वर्षीय बालकाचा दुर्दैवी अंत होण्याची घटना डिचोलीत (Bicholim) घडली आहे. या घटनेमुळे डिचोलीत हळहळ व्यक्त होत आहे. ही घटना काल (गुरुवारी) रात्री 10.30 वाजण्याच्या सुमारास वासुदेवनगर-डिचोली येथे घडली. मयत बालकाचे नाव मिहीर होते जो 4 वर्षाचा होता.

यासंबंधी उपलब्ध माहिती अशी, की, पोलिस खात्याच्या आर्थिक गुन्हा विभागात हवालदारपदी असलेले कुडपवाडा-कारापूर (साखळी) येथील दशरथ वायंगणकर हे काल रात्री आपली ड्युटी संपवून सध्या ते राहत असलेल्या वासुदेवनगर-डिचोली येथील रिव्हर डे या अपार्टमेंटमधील फ्लॅटमध्ये आले. आपल्याजवळील सर्व्हिस पिस्तूल (ग्लॉक पिस्तूल) त्यांनी टेबलवर ठेवून ते स्वच्छतागृहात गेले. मागाहून ही घटना घडली. ही घटना नेमकी कशी घडली, ते समजू शकले नाही. मात्र सर्व्हिस पिस्तूल हातात घेऊन खेळताना चुकून क्लॉक झाल्यानेच ही घटना घडल्याचा अंदाज आहे.

ही घटना घडली, त्यावेळी बालकाची आई आणि दहा वर्षीय बालक किचनरूम मध्ये होते. याप्रकरणी वरिष्ठ पोलिस पुढील तपास करीत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, दशरथ वायंगणकर हे गोव्यात आलेले उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या विशेष सुरक्षा ड्युटीवर होते. ड्युटी आटोपून ते घरी आले होते. सुरक्षा व्यवस्थेनिमित्त श्री. वायंगणकर यांच्या ताब्यात देण्यात आलेले सर्व्हिस पिस्तूल 31 ऑक्टोबर रोजी परत करणार असल्याचे लेखी पत्र श्री. वायंगणकर यांनी ते ताब्यात घेताना पोलिस खात्याला दिलेले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IIT चा माजी विद्यार्थी 700 कोटींची गुंतवणूक करणार; गोव्यात धावणार आणखी EV बसेस, मंत्रिमंडळाची मंजुरी

GPSC परीक्षा म्हणजे काय रे भाऊ? 50 टक्के विद्यार्थ्यांना नाही माहिती, Goa University च्या कामगिरीवर मुख्यमंत्री नाराज

पोटच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, बापाची बाल न्यायालयाने केली निर्दोष मुक्तता; हायकोर्टाने रद्द केला आदेश

Waqf Amendment Bill 2024: वक्फ बोर्ड कायदा प्रस्तावित दुरुस्तीवरून गोंधळ सुरुच, जाणून घ्या काय आहे संपूर्ण प्रकरण

ED Raid: फ्लॅट्सच्या नावाखाली 636 कोटींची फसवणूक; मेरठमधील व्यावसायिकाच्या दिल्ली, गोव्यातील मालमत्तेवर छापे

SCROLL FOR NEXT