गोवा पर्यटनासाठी आलेले हैदराबादचे चारजण अपघातात जबर जखमी  Dainik Gomantak
गोवा

गोवा पर्यटनासाठी आलेले हैदराबादचे चारजण अपघातात जबर जखमी

बेतोडा-बोरी बगलमार्गावर कार व टिप्पर यांच्यात भीषण अपघात

दैनिक गोमन्तक

फोंडा: गोवा पर्यटनासाठी (Goa Tourism) आलेले हैदराबादचे चारजण अपघातात (Accident) जबर जखमी झाले आहेत. बेतोडा-बोरी बगलमार्गावर कार व टिप्पर यांच्यात मंगळवारी सकाळी पावणेदहाच्या सुमारास धडक झाली आणि ही घटना घडली. जखमींना त्वरित फोंडा (Ponda) उपजिल्हा इस्पितळात नेण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर त्यांना पुढील उपचारासाठी बांबोळी (Bambolim)इस्पितळात पाठवण्यात आले.

जीए. 08 के 5057 हा टिप्पर मडगावहून बेतोडामार्गे जात होता, तर विरुध्द दिशेने ए.पी. 21 बीके 1827 ही कार बेतोड्याहून बायपास मडगावच्या दिशेने जात होती. यादरम्यान टिप्पर व कार यांच्यात धडक झाली. यात चालक चंदना भारत (वय 27), प्रवीणकुमार (वय 26), तसेच झाशी व अंझुम (दोघेही वय 26) हे सर्व गंभीररीत्या जखमी झाले. या कारमध्ये दोन पुरुष व दोन महिलांचा समावेश होता.

गोव्यात रविवारी मध्यरात्रीपासून एकामोगामाग बांबोळी, हडफडे, केरी, आगोंद व होंडा आणि आता फोंडाही या पाच ते सहा वेगवेगळ्या ठिकाणी अपघात (Accident) घडण्याच्या घटना घडल्या आहेत. त्यापैकी सोमवारी झालेल्या चार अपघातांमध्ये एका पोलिसासह पाचजणांचा मृत्यू झाला आहे. त्यात महाराष्ट्रीयन पर्यटकांचाही समावेश होता. त्याचबरोबर बांबोळी आणि हडफडे येथे मोठे भीषण अपघात झाले. त्यामुळे सोमवार हा घातवार दिवस ठरला. आणि त्या त्या अपगातातून गोवा आणि महाराष्टर सावरत नाही तर काल गोवा पर्यटनासाठी आलेले हैदराबादचे चारजण अपघातात गंभीर जखमी झाले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Smriti Mandhana Wedding: नॅशनल क्रश क्लीन बोल्ड! स्मृती मानधना लवकरच लग्नबंधनात, 'या' संगीत दिग्दर्शकासोबत जुळली रेशीमगाठ

Virat Kohli: 'किंग'चा लाजिरवाणा कमबॅक: 7 महिन्यांनी परतला, पण फक्त 8 चेंडू खेळून 'शून्य'वर बाद; लज्जास्पद विक्रमाची नोंद VIDEO

कणखर गृहमंत्री ते संवेदनशील कृषीमंत्री: रवी नाईक यांच्या व्यक्तिमत्त्वाचं मुख्यमंत्री फडणवीसांकडून गौरवोद्गार

Ravi Naik: 'मी फक्त पुढे, सेनापती मात्र रवीच'; दिवंगत नेत्याला भावनिक आदरांजली

Horoscope: 71 वर्षांनंतर महासंयोग! यंदाची दिवाळी 5 शुभ योगांची, 'या' राशींचे भाग्य उजळणार; शुभ कार्यांसाठी सर्वोत्तम काळ

SCROLL FOR NEXT