गोवा खाडी अपघात: अभिनेत्री ईश्वरीच्या मृत्यूने हळहळ

‘त्या’ दोघांचेही मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन
Goa Accident: Ishwari Deshpande
Goa Accident: Ishwari DeshpandeDainik Gomantak
Published on
Updated on

शिवोली: नवोदित अभिनेत्री ईश्वरी देशपांडे (Ishwari Deshpande) आणि तिचा मित्र शुभम देडगे (Shubham Dedge) यांच्या अपघाती मृत्यूने (Accident Death) राज्यात (Goa) आणि महाराष्ट्रातही (Maharashtra) खळबळ निर्माण झाली. सोमवारी झालेल्या या दुर्दैवी अपघातात दोघांचीही प्राणज्योत मालवली. या दोघांचे मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आल्याची माहिती हणजुण पोलिस स्थानकाचे निरीक्षक सूरज गावस यांनी दिली.

सोमवारी पहाटे बागा खाडीत कार कोसळून पुणे येथील शुभम देडगे तसेच ईश्वरी देशपांडे यांचा मृत्यू झाला होता. त्यांचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले. त्यानंतर ते उत्तरीय तपासणीसाठी बांबोळी येथे पाठविण्यात आले होते. दोघांचे नातेवाईक सोमवारी रात्री उशिरा गोव्यात पोहोचले. मंगळवारी दुपारी गोमेकॉच्या शवागारात दोन्हीं मृतदेहांवर तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली शवचिकित्सा करण्यात आली. त्यानंतर दुपारी साडेतीनच्या सुमारास मृतदेह घेऊन त्यांचे नातेवाईक पुण्याकडे रवाना झाले.

Goa Accident: Ishwari Deshpande
नव्या गाडीच्या नशेत तरूणाचा बळी, थोडक्यात बचावले प्रेमी-युगल

अरुंद रस्त्याशेजारची झाडेझुडपे कापली

सोमवारी ज्या भागात हा अपघात झाला त्या भागातील अरुंद रस्त्याशेजारची झाडेझुडपे खूप वाढली होती. ती छाटण्याचे काम आज स्थानिक पंचायतीकडून करण्यात आल्याची माहिती नागोवा-हडफडेचे सरपंच राजेश मोरजकर यांनी दिली.

Goa Accident: Ishwari Deshpande
Goa हादरला! सोमवार ठरला घातवार पाच अपघातात 6 जणांचा मृत्यू

म्हणून होतात वारंवार अपघात

मिकीस मार्केटपासून बागा बीचकडे जाणारा पोर्तुगीजकालीन रस्ता आधीच अरूंद आहे आणि रस्त्याच्या एकाबाजूने दाटीवाटीने हॉटेल्स तर दुसऱ्या बाजूने अरबी समुद्राकडे वाहणारी खाडी यामुळे पर्यटकांना वाहने चालवताना अंदाज येत नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Mulgao Accident
 Goa Facebook Part Time Job Scam
Salaulim Dam Water Level
Lavu Mamledar Death Case
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com