Goa Latest Crime News Canva
गोवा

Goa Crime: पुत्रविरहामुळे व्यथित होऊन 'त्याने' संपवले जीवन! सुसाईड नोटमध्ये केला पत्नी आणि तिच्या प्रियकरावर आरोप; Video मध्ये म्हणाला की...

Goa Crime News: कौटुंबिक वादातून पत्नीने घर सोडून चार वर्षांच्या मुलापासून वेगळे केल्याने तणावाखाली आलेल्या कुडतरी येथील रोनाल्डो आल्बुकर्क या ३९ वर्षीय अभियंत्याने बुधवारी मंगळूर येथील एका हॉटेलात गळफास घेऊन आत्महत्या केली.

गोमन्तक डिजिटल टीम

मडगाव: कौटुंबिक वादातून पत्नीने घर सोडून चार वर्षांच्या मुलापासून वेगळे केल्याने तणावाखाली आलेल्या कुडतरी येथील रोनाल्डो आल्बुकर्क या ३९ वर्षीय अभियंत्याने बुधवारी मंगळूर येथील एका हॉटेलात गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी मंगळूर पोलिसांनी रोनाल्डोची पत्नी क्लेरिसा डिकॉस्ता आणि अन्य चौघांवर गुन्हा नोंदविला आहे.

रोनाल्डोची पत्नी क्लेरिसाचे मडगावात ब्युटी पार्लर आहे. सहा महिन्यांपूर्वी त्यांच्यात वाद निर्माण झाल्याने ती चार वर्षांच्या मुलाला घेऊन माहेरी निघून गेली होती. गेल्या सहा महिन्यांत आपल्याला एकदाही मुलाला भेटता आले नाही, म्हणून तो मानसिक तणावाखाली होता.

पुत्रविरहामुळे जीवनाचा अंत केलेल्या रोनाल्डो आल्बुकर्क याच्या मृतदेहावर आज (गुरुवारी) कुडतरी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. रोनाल्डोने आत्महत्या करण्यापूर्वी एक सुसाईड नोट लिहून ठेवला होता. त्यात आत्महत्येसाठी पत्नी आणि तिचा प्रियकर जबाबदार असल्याचे त्याने म्हटले आहे.

रोनाल्डोने मृत्यूपूर्वी तीन व्हिडिओ काढून ठेवले होते. त्यात तो म्हणतो की, माझ्या पत्नीचे दुसऱ्या एकाशी संबंध असून त्यामुळेच ती मला सोडून गेली. ती मला छळत होती. रात्री एकत्र झोपायलाही देत नव्हती. तिच्या खोलीत झोपल्यास ती मला लाथा मारून हाकलून लावत असे.

आणखी एका व्हिडिओत रोनाल्डोने म्हटले आहे की, पत्नी मुलाला घेऊन माहेरी गेली, त्यावेळी मी तिला भेटायला तिच्या माहेरी गेलो असता, तिने गेट बंद करून सुमारे सहा तास मला रस्त्यावरच ताटकळत उभे ठेवले. मुलगा घरात रडत होता, हे मी ऐकत होतो. पण शेवटपर्यंत मला त्याच्याशी भेटू दिले नाही. मी दारातून हलत नाही, हे पाहिल्यावर पोलिसांना पाचारण करून मला तेथून हाकलून लावले. परत घरी आल्यास पोलिसांना बोलावून अटक करू, अशी धमकीही मला दिली होती, असे एका व्हिडिओत रोनाल्डोने म्हटले आहे.

‘व्हॉट्स ॲप’ कॉलवर मुलाला दाखविले

मागील सहा महिन्यांत मला फक्त तीनवेळा ‘व्हॉट्स ॲप’वर व्हिडिओ कॉलवरून माझा मुलगा दाखविण्यात आला; पण तोही फक्त ३० ते ४० सेकंदांपुरताच. मी मुलाला शेवटचा व्हिडीओ कॉलवर पाहिले ते २५ ऑगस्ट रोजी. मुलगा मला पाहून रडत असल्याने पत्नीने लगेच कॉल डिस्कनेक्ट केला, असे रोनाल्डोने व्हिडिओत म्हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pusapati Ashok Gajapathi Raju: पुसापती अशोक गजपती राजूंनी गोव्याचे राज्यपाल म्हणून स्वीकारली सूत्रे; आंध्रवासीयांच्या आनंदाला भरते

खेळणं म्हणून एक वर्षाच्या मुलाने किंग कोब्राचा घेतला चावा; सापाचा मृत्यू, बाळ सुरक्षित

चप्पलने बडवेन! दिल्लीत मुख्यमंत्री सिद्धरामया आणि शिवकुमार यांचे OSD भिडले; सचिवांनी दिले चौकशीचे आदेश

Shocking Video: चावी फिरवत आली अन् क्षणातच चौथ्या मजल्यावरून मारली उडी; दहावीच्या मुलीनं शाळेतच संपवलं आयुष्य, पाहा थरारक व्हिडिओ

Jasprit Bumrah Retirement: रोहित-विराटनंतर बुमराहही कसोटी क्रिकेटला करणार रामराम? माजी भारतीय खेळाडूच्या विधानाने खळबळ

SCROLL FOR NEXT