<div class="paragraphs"><p>New Year Party&nbsp;</p></div>

New Year Party 

 

Dainik Gomantak 

गोवा

मांद्रेत सूर्योदयापर्यंत चालल्या 31 डिसेंबरच्या पार्ट्या

दैनिक गोमन्तक

मोरजी: नववर्षाच्या स्वागतासाठी मांद्रे (Mandrem) मतदारसंघातील किनारी भागात ज्या संगीत रजनी सूर्यास्तानंतर सुरू झाल्या, त्या सूर्योदयापर्यंत चालल्या. यावेळी बेधडक ध्वनिप्रदूषण करणाऱ्यांवर सरकारी यंत्रणेने कोणतीच कारवाई केली नाही. त्याचा लाभ उठवत अनेक आयोजकांनी नव्या वर्षी (New Year) 1 रोजी दुपारपर्यंत पार्ट्या सुरू ठेवल्या.

सरकारने (Government) कोरोनामुळे कडक नियम केले होते. मात्र, त्यांची अंमलबजावणी करताना सरकारी यंत्रणेने थोडी मुभा दिली कारण रात्री 3 नंतर नाईट कर्फ्यू (Night Curfew) लावण्याची शक्यता असल्याने जे पर्यटक स्थिरावले, त्यांना थोडा दिलासा देण्याचा प्रयत्न केला. या किनारी भागात 31 रोजी सायंकाळी 6 वाजल्यापासून संगीत पार्ट्या आयोजित केल्या होत्या. किनाऱ्यावर झगमगाट होता. रात्री 12 नंतर सर्वत्र दारूकामाची आतषबाजी सुरुवात झाली.

पार्टीत हजारो पर्यटक (Tourist) सहभागी झाल्याने अरुंद रस्त्यांवर वाहतूक कोंडीही झाली. यंदा पोलिस यंत्रणेवर राजकीय दबाव जाणवत होता. त्यामुळे कारवाई कुणावर करावी, असा प्रश्‍न पोलिसांना पडला. कारण कुणीच अधिकृत परवाने घेतले नव्हते.

कासव संवर्धन मोहिमेचा फज्जा

मोरजी आणि आश्वे मांद्रे हे दोन किनारे कासव संवर्धन मोहिमेमुळे प्रकाशझोतात आले आहेत. या किनाऱ्यांवर कोणत्याही प्रकारच्या संगीत रजनीसाठी परवाने देण्यावर निर्बंध आहेत. जोपर्यंत सीआरझेड विभागाचा ना हरकत दाखला मिळत नाही, तोपर्यंत परवाने दिले जात नाहीत. मात्र, नोव्हेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून कालपर्यंत दोन्ही किनाऱ्यांवर नाईट क्लबमधून सूर्यास्तानंतर दुसऱ्या दिवशी सूर्योदयापर्यंत बेकायदेशीर पार्ट्या सुरू होत्या.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kanguva: 'कंगुवा'चा टीझर घालतोय धूमाकूळ; गोव्यासह ‘या’ खास ठिकाणी झालं बीग बजेट चित्रपटाचं शूटिंग

Goa Congress: सार्दिन घरात बसून विरियातोंचा प्रचार करतात; पाटकरांनी टोचले MP फ्रान्सिस यांचे कान

Prajwal Revanna: आम्ही व्हिसा दिला नाही… प्रज्वल रेवन्ना जर्मनीला पळून गेल्याच्या प्रश्नावर परराष्ट्र मंत्रालयाची प्रतिक्रिया

Shashi Tharoor In Goa: भाजपला धक्का बसणार, 400 नव्हे 200 पार करने देखील जड जाणार - थरुर

Goa Police : २४ वर्षांपासून अजूनही ‘ते’ न्यायाच्या प्रतिक्षेत; बडतर्फ पोलिसाची व्यथा

SCROLL FOR NEXT