Goa Shacks | Rohan Khaunte Dainik Gomantak
गोवा

Goa Shacks: ..हे तर 'पर्यटक राजदूत'! मंत्री खंवटेंचे सूतोवाच; उर्वरित 30 टक्के शॅक्सना लवकरच परवाने

Rohan Khaunte: इतर ३० टक्के शॅक परवानगी मिळण्याच्या प्रक्रियेत असल्याने लवकरच सर्व शॅक सुरु होणार असल्याची माहिती पर्यटन मंत्री रोहन खंवटे यांनी दिली

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: उत्तर आणि दक्षिण गोव्यात मिळून एकूण ३६२ शॅक आहेत. यातील ७० टक्के शॅक या आठवड्यापासून सुरु होणार आहे. त्यांना आवश्यक सर्व परवानगी दिली आहे. इतर ३० टक्के शॅक परवानगी मिळण्याच्या प्रक्रियेत असल्याने लवकरच सर्व शॅक सुरु होणार असल्याची माहिती पर्यटन मंत्री रोहन खंवटे यांनी दिली. दरम्यान, मंत्री खंवटे यांनी शॅक मालकांना पर्यटक राजदूत म्हणून देखील संबोधिले आहे.

मंत्री म्हणाले की, पर्यटन क्षेत्र राज्याचा कणा आहे. त्यामुळे शॅक व्यावसायिकांना उशिरा परवानगी देणे योग्य नाही. गेल्या वर्षी ज्यांनी पैसे दिले, परंतु शॅक सुरु करू शकले नाही त्यांना यावर्षी शॅक देण्यात आले आहे. मात्र ज्यांनी पैसेही भरले नाही त्यांना शॅक देण्यात आले नाही. तसेच गेल्या वर्षी शॅक व्यावसायिक व्यवसाय करू शकले नसल्याने यावर्षी त्यांच्या शुल्कात वाढही केली नाही, असे ते म्हणाले.

पूर्ण श्रेय खंवटेंना; लोबो

मायकल लोबो म्हणाले की, मंत्र्यांनी शॅक परवानगी देण्यासाठी सिंगल विन्डो क्लिअरन्स प्रक्रिया सुरु केली होती, याची अंमलबजावणी पूर्णपणे झाली आहे. पहिल्यांदाच एफडीए विभागाने पंचायतीत येऊन शॅक व्यावसायिकांना परवानगी दिली. यापूर्वी असे कधीच घडले नाही आणि वेळेत शॅक कधीच सुरु झाले नव्हते. याचे पूर्ण श्रेय मंत्र्यांना जाते असेही त्यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT