Goa Shacks: समुद्रप्रेमींसाठी आनंदवार्ता!! पुढच्या आठवड्यात 70 टक्के शॅक्स उघडण्याची शक्यता

Shacks in Goa: गोव्यातील बहुतेक समुद्रकिनारी शॅक्स पुढील आठवड्यापर्यंत सुरु होण्याची शक्यता
Shacks in Goa: गोव्यातील बहुतेक समुद्रकिनारी शॅक्स पुढील आठवड्यापर्यंत सुरु होण्याची शक्यता
Shacks in GoaDainik Gomantak
Published on
Updated on

Goa Beach Shacks

गोवा: शॅक ओनर्स वेल्फेअर सोसायटीने (SOWS) उत्तर आणि दक्षिण गोव्यातील बहुतेक समुद्रकिनारी शॅक्स पुढील आठवड्यापर्यंत सुरु होण्याची शक्यता वर्तवली आहे. राज्यातील काही शॅक्स सुरु झाले असून इतर भागांमध्ये कामगारांच्या अनुपलब्धतेमुळे झालेला विलंब लवकरच संपणार असून हे शॅक्स लवकरच सुरु होतील.

उत्तर आणि दक्षिण गोव्यातील जवळपास 70 टक्के शॅक्स पुढील आठवड्यापासून सुरु होणार असून बाकी 30 टक्के कामगारांच्या अनुपस्थितीमुळे आणि राज्यातील पावसाच्या जोरामुळे अडकून पडले आहेत.

पर्यटन विभागाकडून 19 जुलै रोजी समुद्रकिनाऱ्यावरील शॅक्सच्या नूतनीकरणाची प्रक्रिया सुरु झाली होती आणि मागच्या वर्षीच्या तुलनेत यंदा ही प्रक्रिया लवकर सुरु झाली असल्याचे SOWS चे अध्यक्ष क्रुझ कार्डोझो म्हणाले आहेत.

Shacks in Goa: गोव्यातील बहुतेक समुद्रकिनारी शॅक्स पुढील आठवड्यापर्यंत सुरु होण्याची शक्यता
Mapusa Theft: चोरट्यांची माहिती मिळाली! म्हापसा 'ज्वेलर्स चोरीप्रकरणी' पोलिसांचे तिसरे पथक मुंबईला रवाना

शॅक मालकांकडून ऑक्टोबरमध्ये गोव्यात येणाऱ्या कामगारांना लवकर गोव्यात येण्याची विनंती केली जातेय, तसेच सरकारने कुठलाही उपाय न सुरु केल्याने सांडपाण्याच्या कचऱ्याचे व्यवस्थापन करण्याची जबाबदारी शॅक मालकांची आहे असं ते म्हणालेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com