Goa Government job  Dainik Gomantak
गोवा

Goa Government job : बीएसएनएलला राज्य सरकारकडून 29 जागा

खासदार फ्रान्‍सिस सार्दिन : ग्रामीण भागात अतिरिक्‍त टॉवर्स वाढविणार

दैनिक गोमन्तक

Goa Government job : गोव्‍यातील दूरध्‍वनी आणि मोबाईल क्षेत्रातील कनेक्‍टीव्‍हिटी वाढविण्‍यासाठी बीएसएनएलने अत्‍याधुनिक साधनसुविधा वाढविण्‍याची राज्‍यव्‍यापी मोहीम हाती घेतली असून ती मार्गी लावण्‍यासाठी गोवा सरकारने आपल्‍या मालकीच्‍या २९ जमिनी बीएसएनएलच्‍या ताब्‍यात देण्‍याचा निर्णय घेतला आहे. या कामाला ऑक्‍टोबरच्‍या दरम्‍यान सुरुवात होण्‍याची शक्‍यता आहे.

बीएसएनएल तांत्रिक विभागाच्‍या सल्‍लागार समितीची बैठक आज खासदार फ्रान्‍सिस सार्दिन यांच्‍या अध्‍यक्षतेखाली झाली.

सार्दिन म्हणाले, बीएसएनएलकडून गोव्‍यात सुविधांचे जाळे वाढविण्‍यात येणार आहे आणि त्‍यासाठी राज्‍य सरकार त्‍यांना जागा देणार अशी माहिती दिली. ज्‍या ठिकाणी कनेक्‍टीव्‍हिटीचा प्रश्न आहे, तिथे टॉवर्स उभारणार असून अन्‍य सुविधा निर्माण करण्‍यासाठी या जमिनींचा वापर होईल.

समस्यांवर चर्चा

या बैठकीत लोकांना लँडलाईन संदर्भांतील येणाऱ्या समस्‍यांवर चर्चा झाली. काही तांत्रिक कारणांमुळे या समस्‍या निर्माण झाल्‍या आहेत. मात्र पावसाळा संपल्‍यावर त्‍या दूर करू, असे आश्‍वासन आपल्‍याला बीएसएनएलच्‍या अधिकाऱ्यांनी दिले आहे. ग्रामीण भागात बीएसएनएल बाबत अनेक तक्रारी आहेत. त्या कमी करण्याचा प्रयत्न असेल, असे सार्दिन यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT