Goa Ganesh Chaturthi 2023: आकर्षक गणेशमूर्ती बनविण्‍याची मिळालीय ‘सिद्धी’

Goa Ganesh Chaturthi 2023: वडिलांकडून मिळाले धडे : सिद्धी किनळेकर यांचे कौशल्‍य भारी; पीओपीला सांगितला चांगला पर्याय
Goa Ganesh Chaturthi 2023
Goa Ganesh Chaturthi 2023Dainik Gomantak
Published on
Updated on

Goa Ganesh Chaturthi 2023: अलीकडच्‍या काळात पर्यावरणाला मारक ठरणाऱ्या प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेशमूर्तीं ग्राहकांच्‍या माथी थोपविल्‍या जात आहेत. या मूर्तींना पर्याय देण्यासाठी सरकारने प्रामाणिक प्रयत्न करणे गरजेचे आहे. पेपर क्ले आणि माती त्‍यावर चांगला पर्याय आहे.

Goa Ganesh Chaturthi 2023
Goa Ganesh Chaturthi 2023: गणेशोत्सव मंडळे लागली कामाला! घरोघरीही सजावटीच्‍या कामाला वेग

सरकारने मूर्तिकारांना तशा पद्धतीचं प्रशिक्षण द्यावं. तसेच गणेशभक्तांनी चिकणमातीच्‍या मूर्तींना प्राधान्‍य द्यावे, असे आवाहन भिरोणे-पेडणे येथील युवा महिला कलाकार सिद्धी किनळेकर यांनी केले.

सिद्धी किनळेकर यांनी आपल्या वडिलांची गणपतीची चित्र शाळा सुरू ठेवली आहे. वडिलांचे निधन झाल्यानंतर ही चित्रशाळा कोण चालवणार, असा प्रश्‍‍न निर्माण झाला होता. परंतु सिद्धी यांनी आपली नोकरी सांभाळत कलेला प्राधान्य देण्यासाठी आपल्या वडिलांची ही चित्रशाळा एक महिला असूनही अखंडितपणे सुरू ठेवली आहे.

बहुतांश गोमंतकीय गणेशभक्त चिकणमातीच्या मूर्तींचेच पूजन करतात. परंतु काही लोक वजनाने हलक्‍या परंतु पर्यावरणाला घातक अशा पीओपीच्‍या मूर्तींना पसंती देतात. याबाबत सगळाच दोष मूर्तिकारांना देता येणार नाही. कारण चिकणमाती आणि मनुष्यबळाची कमतरता मूर्तिकारांना सतावत आहे. शिवाय आवश्यक साचेही वेळेवर उपलब्ध होत नाहीत. त्‍यामुळे ही स्थिती निर्माण झाल्याचे मत सिद्धी यांनी व्यक्त केले.

Goa Ganesh Chaturthi 2023
Kendriya Vidyalaya Ponda: क्षुल्लक कारणावरून विद्यार्थ्याला मारहाण, कुर्टी-फोंडा येथील प्रकार

...तर मूर्तिकारांनी स्‍वत:हून सरकारचे अनुदान नाकारावे

सिद्धी किनळेकर यांनी गणपतीच्या मूर्ती तयार करण्‍याचे धडे आपल्या वडिलांकडून घेतले. गणेशभक्तांना वेळेत मूर्ती उपलब्ध व्हाव्यात यासाठी आपण ही चित्रशाळा पुढे चालू ठेवली, असे त्‍या सांगतात. पर्यावरणाला प्राधान्‍य देऊन प्रत्‍येक मूर्तिकाराने आपण कोणत्याही परिस्थितीत प्लास्टर ऑफ पॅरिसच्‍या मूर्ती आपल्या चित्रशाळेत आणणार नाही असे ठरविले तर अशा मूर्तींवर आपोआप नियंत्रण येऊ शकते. तसेच जर एखादा मूर्तिकार आपल्या चित्रशाळेमध्ये प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेशर्ती विक्रीला ठेवत असेल तर त्याने स्‍वत:हून सरकारचे अनुदान नाकारावे. ते घेऊ नये, असे त्‍यांचे मत आहे.

वयाच्‍या आठव्‍या वर्षापासून मी वडिलांकडून मूर्तिकलेचे धडे घेतले. त्‍यांचे गेल्यावर्षी निधन झाले. सर्व दु:ख विसरून त्‍यांची ही चित्रशाळा मी पुढे सुरू ठेवली. चार पिढ्यांची परंपरा लाभलेली ही गणपतीची चित्रशाळा आमच्‍या पुढच्‍या पिढीनेही सुरू ठेवावी अशी माझी इच्‍छा आहे.

- सिद्धी किनळेकर, मूर्तिकार

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com