कदंबच्‍या उत्‍पन्नाला ‘ब्रेक’! Bhushan Aroskar
गोवा

कदंब बसेसच्‍या 266 फेऱ्या बंद; उत्‍पन्नाला ब्रेक!

कोरोनामुळे कदंब बसेसच्‍या 266 फेऱ्या बंद; महाराष्‍ट्र, कर्नाटकातील स्‍थितीवर बरेच काही अवलंबून

दैनिक गोमन्तक

पणजी: कोविड महामारीमुळे कदंब बसेसच्‍या तब्बल 266 फेऱ्या गेल्‍या काही महिन्‍यांपासून बंद असल्‍यामुळे कदंब महामंडळाला मोठा तोटा सहन करावा लागला आहे. त्‍यामुळे या बसेस सद्य:स्थितीत पणजी डेपोत उभ्या करून ठेवल्‍या आहेत. रद्द झालेल्या फेऱ्यांमध्‍ये दूरच्या महानगरांना जोडणाऱ्या व राष्ट्रीय महामार्गावरुन धावणाऱ्या 7 फेऱ्या, राज्याबाहेरील महाराष्ट्र व कर्नाटकमधील जवळच्या शहरांना जोडणाऱ्या 25 फेऱ्या तर मुख्य ठिकाणच्या 234 फेऱ्यांचा सामावेश आहे. कोविड निर्बंधात शिथिलता येत असल्‍यामुळे पुढील काही दिवसांत कदंब महामंडळाचा कारभार हळूहळू पूर्वपदावर येण्‍याची शक्‍यता आहे. (266 rounds of Kadamba buses in Goa closed)

गतवर्षी कोरोना आला आणि सर्वांनाच आर्थिक फटका देऊन गेला. दरम्यानच्या काळात परिस्थिती नियंत्रणात आल्याने निर्बंध शिथिल करण्‍यात आले व आर्थिक चक्र गतिमान झाले. मात्र, दुसऱ्या लाटेने पुन्हा एकदा गोव्यासह देशाचे आर्थिक विकासाला ब्रेक लावला. यात सर्वांत जास्त फटका वाहतूक व्यवस्थेला बसला. कदंब वाहतूक महामंडळालाही आपल्या निम्‍म्यापेक्षा जास्त फेऱ्या रद्द कराव्या लागल्या. अलीकडे कोरोना रुग्‍णांच्‍या संख्‍येत घट झाल्‍याने तसेच लसीकरणाचा वेग वाढल्याने वाहतूक क्षेत्रासह इतर क्षेत्रांतील निर्बंधात शिथिलता आणली गेली. साहजिकच कदंबच्‍या फेऱ्यांतही वाढ झाली. तरीसुद्धा कर्नाटक व महाराष्ट्रातून जास्त उत्पन्न मिळवून देणाऱ्या दूर पल्‍ल्याच्या 8 पैकी 7 फेऱ्या तर जवळच्या 33 पैकी 25 फेऱ्या अद्यापही बंदच आहेत.

दूर पल्‍ल्‍याच्‍या फेर्‍यांतून होतो चांगला नफा

दूर पल्‍ल्याच्या फेऱ्यांमध्ये हैदराबाद, बेंगलोर, पुणे, मुंबई, शिर्डी, बोरीवली, सोलापूरचा समावेश आहे. फक्त पणजी-पुणे स्लीपर ही केवळ एकच फेरी सुरु आहे. दूरच्या पल्‍ल्यातून कदंब महामंडळाला चांगला नफा प्राप्त होतो. मात्र महाराष्ट्रातील पुणे, मुंबई यासारख्या महत्त्‍वाच्‍या शहरांत कोरोनाचा प्रादुर्भाव फारसा कमी न झाल्याने शिवाय तेथे वाहक/चालकांना पाठविण्याची भीती असल्याने या फेऱ्या अद्यापही बंदच आहेत.

शिवाय इतर फेऱ्यांत महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग, कोल्हापूर तर कर्नाटकमधील बेळगाव, गुलबर्गा, रायचूर, अनमोडे याठिकाणच्या बहुतांशी फेऱ्या रद्दच असल्‍याने कदंब महामंडळाच्या तोट्यात आणखीच वाढ झाली आहे. सद्य:स्थितीत प्रवाशांकडे कोरोना निगेटिव्ह प्रमाणपत्र असल्यास महाराष्ट्राच्‍या व कर्नाटकच्‍या बसेस गोव्‍यात येतात, पण अल्‍प प्रमाणात. मात्र कदंबच्‍या बसेस तेथे जात नाहीत. अलीकडे कर्नाटकात पाच बसेस सुरू करण्‍यात आलेल्‍या आहेत.

येत्‍या 16 ऑगस्‍टपासून कर्नाटकातील कारवार येथे कदंब बस पाठविण्‍याचा विचार आहे. महाराष्‍ट्रातील कोरोनाची स्‍थिती लक्षात घेऊन त्‍याबाबत नंतर निर्णय घेण्‍यात येईल. सध्‍या पणजी-मडगाव मार्गावर बसेस धावत असल्‍या तरी प्रवासी नसल्‍याने त्‍या तोट्यातच आहेत. कदंबच्‍या 500 पैकी फक्त 220 बसेस राज्‍याअंतर्गत सुरू आहेत.

- संजय घाटे, कदंब महामंडळाचे सरव्‍यवस्‍थापक

महाराष्ट्र, कर्नाटकातील कदंबच्‍या फेऱ्या

पणजी, मडगाव आणि वास्को येथून वेंगुर्ले, कोल्हापूर, मिरज, विजयदुर्ग, सावंतवाडी, कोरजाई, मडुरा-बांदा, तिळारी, दोडामार्ग-उसप, पत्रादेवी-सावंतवाडी, मालवण येथे फेऱ्या व्हायच्या. मात्र, यातील सावंतवाडी-पत्रादेवी हीच एक बस सीमेपर्यंत जाते. मात्र महाराष्ट्राच्या हद्दीत प्रवेश करत नाही. तर,मडगाव व पणजी येथून गुलबर्गा, अनमोड-बेळगाव, रायचूर, चोर्ला-बेळगाव, म्हैसूर, सौदंती या सर्व फेऱ्या बंद ठेवण्यात आल्या आहेत. दरम्‍यान, कदंब महामंडळाने शालेय विद्यार्थ्यांसाठी 43 फेऱ्या सुरु केल्या होत्या. मात्र सध्या शाळा बंद असल्याने तसेच कोणतीही बसफेरी सुरु नाही. 20 ते 30 किलोमीटरपर्यंत फेऱ्या मारुन विद्यार्थ्याना शाळेत पोहोचविण्याचे काम कदंब बसेस करायच्या. पासची सुविधा उपलब्‍ध होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa LPG Advisory: एलपीजी ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; गोवा सरकारकडून अ‍ॅडवायझरी जारी

Ferrari Seized: महाराष्ट्रात नोंदणीकृत 7.5 कोटींची 'फेरारी' कर्नाटकमध्ये चालवली म्हणून केली जप्त; काय नेमकं प्रकरण? वाचा

IND Vs ENG: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये टीम इंडियाने रचला इतिहास, परदेशी भूमीवर केली दमदार कामगिरी; कांगारुंचा मोडला रेकॉर्ड

Goa News Live: अडवलपालमध्ये गढूळ पाण्याचा पुरवठा, 'फोमेंतो' कंपनीच्या रिजेक्शनमुळे समस्या

Operation Sindoor: 'भारत पाकिस्तानसोबत चीनशीही लढत होता...' ऑपरेशन सिंदूरबाबत भारतीय उप सेनाप्रमुखांचे मोठे वक्तव्य

SCROLL FOR NEXT