Dengue Cases In Goa Dainik Gomantak
गोवा

Dengue Cases In Goa: पुन्हा चिंता वाढली! डेंग्यूमुळे गोव्यात एकाचा मृत्यू; फोंड्यात आढळले 26 संशयास्पद रुग्ण

Dengue Cases In Goa: राज्यात पुन्हा डेंग्यू आणि मलेरियाचे रुग्ण वाढू लागल्याने चिंता वाढली आहे. फोंड्यात जून ते 15 ऑगस्टपर्यंत डेंग्यूचे 26 संशयास्पद रुग्ण आढळून आले आहेत.

Manish Jadhav

राज्यात पुन्हा डेंग्यू आणि मलेरियाचे रुग्ण वाढू लागल्याने चिंता वाढली आहे. फोंड्यात जून ते 15 ऑगस्टपर्यंत डेंग्यूचे 26 संशयास्पद रुग्ण आढळून आले आहेत. शांतीनगर परिसरातील सर्वाधिक 7 रुग्णांचा समावेश आहे. डेंग्यूची लागण झाल्याने गोव्यात एकाचा मृत्यूही झाला आहे. दुसरीकडे, राज्यात येत्या चार-पाच दिवसांत पुन्हा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन फोंडा प्राथमिक आरोग्य केंद्रातर्फे करण्यात आले आहे. पुन्हा एकदा रोगराईचे प्रमाण वाढू शकते.

दरम्यान, फोंड्यात (Ponda) गेल्या अडीच महिन्यात सुमारे 26 संशयास्पद डेंग्यू रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकीही जून आणि जुलै महिन्यात 23 तर ऑगस्ट महिन्याच्या 15 दिवसात केवळ 3 डेंग्यू रुग्ण आढळले आहेत.

दुसरीकडे, खबरदारीचा उपाय म्हणून फोंडा आरोग्य केंद्रामार्फत रुग्णांच्या घराजवळ औषधांची फवारणी करण्यात येतेय. याशिवाय, आरोग्य केंद्रामार्फत डेंग्यू संबंधी जनजागृती करण्यात येतेय. पावसाचा जोर कमी झाल्यानंतर रुग्णांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता असून लोकांना जागृत करण्यात येतेय.

तसेच, डेंग्यू (Dengue) आजाराबाबत आरोग्य अधिकाऱ्यासह आरोग्य केंद्राचे कर्मचारी खबरदारीचा उपाय म्हणून विविध ठिकाणी जाऊन लोकांना डेंग्यू आजाराबाबत माहिती देत आहेत. येत्या काही दिवसांमध्ये 5-6 दिवसांपेक्षा अधिक दिवस पाणी साठवून ठेवण्यात येवू नये असे आवाहन फोंडा आरोग्य खात्याकडून करण्यात आलेय.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Grah Gochar 2026: 1 सप्टेंबरला बनणार 6 शक्तिशाली राजयोग! 'या' राशींची तिजोरी पैशांनी भरणार; होणार अफाट धन वर्षाव

Weather Update: ऑगस्टमध्ये समाधानकारक पाऊस, सर्वाधिक वाळपईत; जुलैमधील पावसाचा तुटवडा मात्र कायम

Marcel Road Issue: माशेलात 'वर्दळीचा' रस्ता धोकादायक, खड्ड्यांमुळे वाहतुकीला अडथळा; पावसात दुचाकीस्वारांसमोर मोठे संकट

Panaji: थकीत घरपट्टीचा फटका भाडेकरूंना; उत्पन्नाचा दाखला मिळविताना भाडेकरूंच्या मुलांची मोठी कसरत

Police Attack Viral Video: पीएसआयचा गळा आवळला, लोखंडी साखळीने हल्ला... लखनऊमध्ये अतिक्रमण हटवताना राडा; दोन महिलांसह 6 जणांना बेड्या

SCROLL FOR NEXT