Goa vaccination Dainik Gomantak
गोवा

Goa Vaccination: पंधरा दिवसांत 2,18,955 जणांना दिली लस

काल गोवा विमानतळावर मुंबईहून कोविड लसीचे (Vaccine) आणखी 17 बॉक्स आले आहे.

दैनिक गोमन्तक

पणजी: राज्यात जुलैच्या पहिल्या पंधरा दिवसात तब्बल 2 लाख 18 हजार 955 जणांचे लसीकरण (Vaccination) झाले आहे. 18 वर्षांवरील सुमारे साडेअकरा लाख व्यक्तींना 31 जुलैपर्यंत कोरोनाप्रतिबंधक लसीचा पहिला डोस देण्याचा संकल्प मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केला असून त्याअनुषंगाने लसीकरणाचा वेगही वाढवण्यात आलेला आहे. (2,18,955 people were vaccinated in Goa)

त्यामुळे राज्यात आत्तापर्यंत 11 लाख 37 हजार 125 जणांना लस देण्‍यात आली आहे. त्यात 9 लाख 43 हजार 155 लोकांनी पहिला डोस तर 1 लाख 93 हजार 970 लोकांनी दुसरा डोस घेतला आहे. काल गुरुवारी 10,902 जणांचे लसीकरण झाले. एका बाजूला राज्यात मोठ्या प्रमाणात लसीकरण सुरु आहे.

15 दिवसांतील लसीकरण, आकडेवारी

  1. लसीकरण.............2,18,955

  2. कोरोना चाचण्या.........66,034

  3. नवे कोरोना रुग्ण............2652

  4. बरे झालेले रुग्ण.............3099

  5. कोरोनामुळे मृत्यू.............48

गुरुवारची आकडेवारी

  • लसीकरण................10,902

  • पहिला डोस.................5992

  • दुसरा डोस..................4910

  • कोरोना चाचण्या............4063

  • नवे रुग्‍ण......................126

  • बरे झालेले रुग्‍ण...............134

  • मृत्‍यू.............................1

15 दिवसांतील लसीकरण, आकडेवारी

दरम्यान गोवा सरकारने घोषित केले आहे की ते कोविड-नकारात्मक प्रमाणपत्रांशिवाय आणि लसिकरणाचे दोन्ही डोज घेतल्याशिवाय पर्यटकांनादेखील गोव्यात प्रवेश देणार नाहीत. राज्यात कोविड इन्फेक्शनचा प्रसार रोखण्यासाठी हे कडक निर्बंध लावले जात असल्याचे मुख्यमंत्री सावंत यांनी सागितले. मात्र, गोव्यातील मुंबई उच्च न्यायालयाने सांगितले की, गोव्यामध्ये संपूर्णपणे लसीकरण केलेल्या लोकांना नोकरी व व्यवसायाच्या उद्देशाने किंवा मायदेशी परतणार्‍या गोव्यातील नागरिकांना covid-19 नकारात्मक प्रमाणपत्र आवश्यक असणार नाही.

काल गोवा विमानतळावर मुंबईहून कोविड लसीचे आणखी 17 बॉक्स आले आहे. आणि जलद कार्यवाही करत गोवा विमानतळ प्राधीकरणाने हे 17 बॉक्स राज्य सरकारकडे सुपूर्द केले आहे. राज्यात लसिकरणाला वेग आला असून 31 जुलैपर्यंत शंभर टक्के लोकांना अर्थात 18 वर्षावरील सर्वांना लस देण्याचे ध्येय गोवा सरकारने ठेवले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

PM SVANidhi Scheme: स्टॉल चालवणाऱ्यांसाठी मोदी सरकारचं गिफ्ट! आता मिळणार 'इतक्या' हजारांच्या विनाहमी लोनसह खास कार्ड; पीएम स्वनिधी योजनेचा धमाका

POK News: "आम्हाला फसवलं गेलं...!", पाकिस्तानी लष्कराच्या भूमिकेवर POK मधील आंदोलक संतप्त; 21 जुलैपर्यंतचा दिला अल्टिमेटम

EPFO Interest: करोडो पगारदारांसाठी आनंदाची बातमी! ईपीएफओने व्याजाचे पैसे खात्यात पाठवण्यास केली सुरुवात; असे चेक करा

Viral Video: हातात काठी, जमिनीवर पडलेला माणूस अन् थरकाप उडवणारे दृश्य, भर रस्त्यात बाईकस्वारासोबत घडला अजब प्रकार; अतरंगी व्हिडिओ व्हायरल

Gold Silver Price: लग्नसराईपूर्वी ग्राहकांना मोठे गिफ्ट! सोने आणि चांदी एकाच वेळी झाले स्वस्त; पाहा आजचे ताजे दर

SCROLL FOR NEXT