Goa: साखळीत 17 वर्षीय विद्यार्थ्याने संपवली जीवनयात्रा

जीवनयात्रा संपविलेला विद्यार्थी देसाईनगर-साखळी येथील असल्याची माहिती मिळाली आहे.
विद्यार्थ्याने संपवली जीवनयात्रा
विद्यार्थ्याने संपवली जीवनयात्रा Dainik Gomantak
Published on
Updated on

डिचोली: डिचोलीत एका 27 वर्षीय युवकाने आत्महत्या करण्याची घटना काही दिवसांपुर्वीच घडली होती. ही घटना ताजी असतानाच आज पुन्हा साखळी येथे एका 17 वर्षीय विद्यार्थ्याने आत्महत्या करून दुर्दैवीरित्या जीवनाचा शेवट केला. (17-year-old student committed suicide at the Sanquelim in Goa)

जीवनयात्रा संपविलेला विद्यार्थी देसाईनगर-साखळी येथील असल्याची माहिती मिळाली आहे. काल रात्री उशिरा आपल्या राहत्या घरातच त्यांनी हे अविचारी पाऊल उचलले असे सांगण्यात येत आहे. या विद्यार्थ्याने नेमकी आत्महत्या का केली, त्याचे कारण अद्याप समजू शकले नाही.

विद्यार्थ्याने संपवली जीवनयात्रा
Goa Crime: कारमध्येच साधला डाव आणि अमरच्या डोक्यात घातली गोळी

दुर्दैवी विद्यार्थ्याची आई एका शाळेत शिक्षिका असल्याचे समजते आहे. या विद्यार्थ्याने दुर्दैवीरित्या जीवनाचा शेवट केल्याने साखळी भागात हळहळ व्यक्त होत आहे. मागील 23 जून रोजी बोर्डे-डिचोली येथे एका 27 वर्षीय युवकाने विहिरीत उडी मारून जीवनाचा शेवट केला होता. त्यानंतर तालुक्यातील ही दुसरी भयंकर घटना घडली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Assembly Election Results 2026
Goa teacher sentenced 11 years
Goa Cashew Season 2026
morajit road traffic problem today
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com