21,000 people registered for Goa job fair only 10,000 attended Dainik Gomantak
गोवा

Goa Job Fair: नोंदणी 21 हजार जणांची, उपस्थिती केवळ 10,000

सत्ताधाऱ्यांमध्ये मतभेद : विरोधकांकडून घोषणेचे स्वागत; रोजगार मेळाव्याचा गाजावाजाच मोठा

दैनिक गोमन्तक

पणजी: सरकारच्या रोजगार आणि कामगार आयुक्तालयाने गाजावाजा करून आयोजित केलेल्या रोजगार मेळाव्यासाठी तब्बल 21 हजार युवक-युवतींनी नोंदणी केली होती. पण त्यापैकी 50 टक्क्यांपेक्षा कमी म्हणजे 10 हजार जणांनी प्रत्यक्ष हजेरी लावली.

(21,000 people registered for Goa job fair only 10,000 attended)

गोव्यात प्रामुख्याने ‘टार्गेट ओरिएंटेड’ कंत्राटी पद्धतीच्या मार्केटिंग-सेल्समध्ये संधी असल्याने केवळ 500 जणांना नियुक्तीपत्रे मिळाली. तर 4800 जणांना शॉर्टलिस्टेड केले असून ही प्रक्रिया सुरूच राहणार आहे.

रोजगार आणि कामगार आयुक्त राजू गावस म्हणाले, मेळाव्याला राज्यभरातील 155 कंपन्यांनी पूर्वनोंदणी केली होती. त्यानंतर 15 कंपन्या प्रत्यक्ष आयोजनस्थळी सहभागी झाल्या. त्यामुळे हा आकडा 170 वर गेला. या अगोदर आम्ही 4 हजार नोकऱ्या जाहीर केल्या होत्या. त्यात भर पडत 5500 हून अधिक नोकऱ्या उपलब्ध असल्याचे कंपन्यांनी सांगितले होते. त्यानुसार 4800 लोकांना शॉर्टलिस्टेड करण्यात आले आहे. ही त्यांची पहिली मुलाखत वजा चाचणी झाली. त्यांची कंपनी व प्रादेशिक कार्यालयात अंतिम परीक्षा होईल. सध्या मेळाव्यातील दोघेजण कामावर रुजुही झालेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT