Goa News: CBI अधीक्षक आशेश कुमार यांना लाचविषयक ‘ते’ वक्तव्य भोवले; थेट उचलबांगडी

गोव्याचे नवे सीबीआय अधीक्षक आलोक कुमार
CBI | Tata Projects Bribery Case
CBI | Tata Projects Bribery Case Dainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: राज्यात सीबीआयच्या भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागामार्फत गत पाच वर्षांत एकही लाचप्रकरण नोंद नाही. त्यामुळे केंद्रीय खात्यातील कर्मचारी भ्रष्ट नसल्याचा अर्थ निघतो, असे विधान सीबीआय अधीक्षक आशेश कुमार यांनी केले होते. त्यांच्या या वक्तव्यानंतर सात दिवसांतच त्यांची मुंबईच्या कार्यालयात उचलबांगडी झाली आहे. त्यांच्या जागी आलोक कुमार यांची नियुक्ती झाली आहे.

(Goa's new CBI Superintendent Alok Kumar )

CBI | Tata Projects Bribery Case
Global Expo India conference: ...तर गोवा सॉफ्टवेअर, हार्डवेअर उत्पादनासाठी ओळखला जाईल

दक्षता सप्ताहात सीबीआय पोलिस अधीक्षक आशेश कुमार यांनी पत्रकार परिषद घेतली होती. त्यावेळी केंद्रीय खात्यातील एकाही कर्मचाऱ्याविरुद्ध तक्रार आली नाही. लोकांची कामे लाच देऊन होत असल्याने सीबीआयकडे तक्रार देऊन त्यानंतर हेलपाटे मारायला लागतात असे त्यांना वाटते, असे मत व्यक्त केले होते.

मात्र, तक्रार आल्याशिवाय किंवा माहिती मिळाल्याशिवाय सीबीआय कशी कारवाई करणार? असा प्रश्‍नही त्यांनी उपस्थित केला होता. गोवा सीबीआयनेही लोकांमध्ये जागृती करण्यास कोणतेच प्रयत्न केले नाहीत. त्यांनी केलेले हे विधान वादग्रस्त ठरून सीबीआयच्या कार्यपद्धतीवरच बोट ठेवणार होते. त्यांच्या या विधानाची दखल वरिष्ठ पातळीवर घेण्यात येऊन त्यांची मुंबईत बदली झाली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com