Goa Taxi Driver Assaulted  Dainik Gomantak
गोवा

Goa Taxi Driver Assaulted : टॅक्सी चालकाला मारहाण करून केली टॅक्सीची चोरी; महाराष्ट्रातील दोघांना अटक

महाराष्ट्रातील दोघांनी एका टॅक्सी चालकाला मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

दैनिक गोमन्तक

Goa Taxi Driver Assaulted : अनेकदा गोव्यातील टॅक्सी दरावरुन आणि टॅक्सी चालकांच्या वर्तणूकीवरून त्यांना बोलले जाते. गोव्यात येणाऱ्या पर्यटकांनी अनेकदा गोव्यातील टॅक्सी चालकांबद्दल नाराजीही व्यक्त केली आहे.

पण प्रत्येकवेळी चालकांचीच चूक असते असं नाही. अशीच एक घटना गोव्यात घडली आहे. महाराष्ट्रातील दोघांनी एका टॅक्सी चालकाला मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

माहितीनुसार, महाराष्ट्रातील दोघांनी गोव्यातील टॅक्सी चालकाला मारहाण करून त्याच्या वाहनासह पणजी येथून पळ काढला होता.

त्यानंतर गोवा पोलिसांची यंत्रणा सज्ज झाली असून त्यांनी निखिल विजय शेट्टी (22) याला सोलापूर, महाराष्ट्र आणि वैभव जव्हेरी (23) याला महाराष्ट्रातील इचलकरंजी येथून आपल्या ताब्यात घेतले आहे.

अॅन्टोनियो रॉड्रिग्स (54) हे सासष्टी येथील रहिवासी असून यांनी या घडल्या प्रकाराबद्दल तक्रार दाखल केली होती. 6 जानेवारी रोजी दुपारी 2.15 च्या सुमारास, दोन अज्ञात व्यक्तींनी आपण ग्राहक असल्याचे सांगत त्यांच्यावर हल्ला केला आणि त्यानंतर त्यांची कार घेऊन पळ काढला.

हा सर्व प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आणि आंतरराज्य गुप्तचर सूत्रांना सतर्क करण्यात आले. वर्णन केल्याप्रमाणे साजेशी गाडी सोलापुरात पोलिसांना आढळून आली. गाडीला नंबर प्लेट नव्हती. मग गोव्यातील एक पथक तिथे पाठवून महाराष्ट्र पोलिसांच्या मदतीने आरोपींना अटक करण्यात आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: 3 तास खुर्चीला बांधून मारहाण, कान खेचल्याने कानाचा पडदा सुजला; दिल्लीतील प्लेस्कूलमध्ये 3 वर्षांच्या चिमुकल्याचा छळ

Mumbai-Goa Highway वर भीषण अपघात! भरधाव कारनं दोन अल्पवयीन मुलींना उडवलं, दोघींचीही प्रकृती गंभीर Watch Video

'धुरंधर' स्टाईल फायरींगनं हादरला पाकिस्तान! जैश-ए-मोहम्मदच्या बड्या कमांडरचा खेळ खल्लास; अज्ञात बंदूकधाऱ्यांनं काढला काटा VIDEO

VIDEO: जखमी चेहरा, पाठीवर रडणारी बहीण, पुराचा हाहाकार! नेपाळमधील 'तो' 50 सेकंदांचा व्हिडिओ व्हायरल; तुमचेही पाणावतील डोळे

नो बॉलनंतर 'फ्री हिट' नको, गोलंदाजाला दंड ठोठवावा! सुनील गावसकरांची मोठी मागणी

SCROLL FOR NEXT