Goa IT Chief Pravin Valvatkar |National Award
Goa IT Chief Pravin Valvatkar |National AwardDainik Gomantak

National Award: गोवा माहिती तंत्रज्ञान संचालक प्रवीण वळवटकर यांचा राष्‍ट्रपतींच्‍या हस्‍ते सन्‍मान

गोवा माहिती तंत्रज्ञान संचालक प्रवीण वळवटकर यांना आयटी पुढाकारासाठी विशेष पुरस्कार प्रदान करण्यात आला.
Published on

National Award: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी बुधवारी 13व्या राष्ट्रीय मतदारदिन सोहळ्यात 2022 वर्षीच्‍या उत्कृष्ट निवडणूक पद्धतींसाठीचे राष्ट्रीय पुरस्कार विविध मान्यवरांना प्रदान केले. एकूण 13 पुरस्कार विजेत्यांना गौरविण्यात आले. त्यात गोवा माहिती तंत्रज्ञान संचालक प्रवीण वळवटकर यांचा समावेश होता.

वळवटकर यांना आयटी पुढाकारासाठी विशेष पुरस्कार प्रदान करण्यात आला. मतदारसंबंधी कोणत्याही शंकांचे निरसन करू शकणाऱ्या टेलिग्राम आधारीत चॅटबॉट ‘व्होटर्स दोस्त’ची निर्मिती केल्याबद्दल त्यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे.

मतदानावेळी मतदानकेंद्रांबाहेरील रांगेतील मतदारांची संख्या त्वरित वेबकास्टिंग पद्धतीने प्राप्त करणे शक्य झाले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com