Doctors Dainik Gomantak
गोवा

गोव्यातील शिवानी, पूनम यांनी घडवला इतिहास

सत्तरी धनगर समाजात प्रथमच बनल्या दोन डॉक्टर; समाजातर्फे गौरव होणार

दैनिक गोमन्तक

पिसुर्ले : गोवा वैद्यकीय महाविद्यालयातर्फे मार्च 2022 मध्ये एमबीबीएसच्या शेवटच्या वर्षांसाठी घेतलेल्या परीक्षेत भेडशेवाडा-भुईपाल येथील शिवानी मोटे, तार-धावे येथील पूनम झोरे या दोघींनी यशस्वीरीत्या वैद्यकीय पदवी संपादन केली. त्या सत्तरी धनगर समाजातील पहिल्याच त्या दोघी डॉक्टर झाल्या. त्याबद्दल त्यांचे अभिनंदन करण्यात येत असून त्यांचा भव्य गौरवही समाजातर्फे करण्यात येणार आहे.

गोवा राज्याच्या विविध तालुक्यांत वास्तव्य करणाऱ्या धनगर समाजातील मुले हल्लीच्या काळात शैक्षणिक स्तरावर बरीच प्रगती करीत असल्याचे दिसून येत आहे. त्यात उच्चस्तरीय शिक्षण घेऊन आपले तसेच समाजाचा नावलौकिक वाढवत आहे. यामध्ये सत्तरी तालुक्यात आत्तापर्यंत इंजिनिअर, वकील, शिक्षक तसेच इतर क्षेत्रात प्रावीण्य मिळवलेले युवक-युवतींचा समावेश आहे. परंतु गोवा मुक्तीनंतरच्या साठ वर्षांच्या या काळात सत्तरी तालुक्यात अजूनपर्यंत कोणीच डॉक्टर बनले नव्हते. पण शिवानी, पुनम यांनी मिळवलेले यश हे कौतुकास्पद आहे.

डॉ. शिवानी मोटे हिचे प्राथमिक शिक्षण वाळपईतील युनिटी, प्राथमिक शाळा, पिसुर्ले येथे झाले. पाचवीपर्यंतचे शिक्षण सरकारी माध्यमिक विद्यालय पिसुर्लेत झाले. त्यानंतर वाळपई, काणकोण नवोदयमध्ये शिक्षण घेतले. बारावीतील यशानंतर गोवा मेडिकल कॉलेजमध्ये एमबीबीएसचे शिक्षण पूर्ण केले.

डॉ. पूनम झोरे हिचे प्राथमिक शिक्षण ज्ञानसागर विद्यामंदिर तार-धावे येथे झाले. तर इयत्ता दहावी पर्यंतचे शिक्षण अवरलेडी हायस्कूल वाळपई, तर उच्च माध्यमिक शिक्षण पर्ये सत्तरी येथील भूमिका उच्च माध्यमिक विद्यालयात झाले. त्यानंतर तिने गोवा वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएसचे शिक्षण पूर्ण केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Air Force Base Attack: विमानतळावर गोळीबार अन् स्फोटांचा आवाज! एअर बेसला दहशतवाद्यांनी बनवलं निशाणा; 20 ठार, 11 जणांना बेड्या VIDEO

Social Media Ban Goa: सोशल मीडिया वापरावर सरसकट बंदी अयोग्य! तवडकरांचे प्रतिपादन; अभ्यासावर मर्यादा येण्याची शक्यता व्यक्त

"कधी नारद, कधी चार्ली चॅप्लिन, कधी श्रीकृष्ण"! गोव्यातले बापलेक जपताहेत 800 वर्षांची परंपरा; भांड-बहुरूपी कला

Ind Vs NZ: '..मुद्दामून असे केले'! न्यूझीलंडविरुद्धच्या पराभवानंतर सूर्याचे खळबळजनक वक्तव्य; अय्यरबाबत केले मोठे विधान

Stray Dogs: 'भटक्या कुत्र्यांमुळे पर्यटन घटले'! सर्वोच्च न्यायालयाची टिप्पणी; निर्बीजीकरणच्या अपयशावरती चर्चा

SCROLL FOR NEXT