Arnoldo Soares Murder Case Dainik Gomantak
गोवा

Goa Murder Case: कांदोळी खूनप्रकरणी दोघे ताब्‍यात; सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे संशयितांचा शोध

Candolim Crime News: एक संशयित होता सुवारिस यांच्‍या घरी कामाला

गोमन्तक डिजिटल टीम

म्हापसा, ता. १६ (प्रतिनिधी) : ओर्डा-कांदोळी येथे अरनॉल्ड सुवारिस (६८) यांचा धारदार शस्त्राने सपासप वार करून निर्घृणपणे खून केल्‍याप्रकरणी कळंगुट पोलिसांनी कर्नाटकमधून दोघांना ताब्यात घेतले आहे. यातील २० वर्षीय संशयित हा सुवारिस यांच्या घरी यापूर्वी कामाला होता, असे सूत्रांनी सांगितले.

दरम्यान, सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे संशयितांचा मागावा काढण्यात पोलिसांना यश आले. सुवारिस हे आपल्‍या घरात एकटेच राहत होते.

सदर घटना गेल्‍या शनिवारी १३ जुलैला मध्यरात्री अडीचच्या सुमारास घडली होती. संशयितांनी घराची कौले काढली व वाशाला नायलॉन दोरी बांधून घरात प्रवेश केला होता. यावेळी संशयिताच्या पायाचे ठसे घरातील भिंतीवर उमटले होते. त्‍याने चोरीच्या तयारीने घरात घुसखोरी केली, पण झोपेत असलेल्या सुवारिस यांना कदाचित जाग आली असावी आणि बेत फसला, असे प्रथमदर्शनी दिसते. आता मारेकरी खरोखरच चोरीच्या उद्देशाने घरात शिरला होता की दुसरे कारण आहे, हे पोलिस तपासात स्पष्ट होईलच.

सुवारिस यांना जाग आल्‍यावर संशयित मारेकरी व त्‍यांच्यात झटापट झाली असता, मारेकऱ्याने धारदार शस्त्राने सुवारिस यांच्या पाठीवर सपासप वार केले. त्‍यात मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्याने सुवारिस यांचा जागीच मृत्यू झाला असावा, असा अंदाज आहे.

या प्रकारामुळे बिथरलेल्या मारेकऱ्याने घरातून कुठलीही मौल्यवान वस्तू न चोरताच तेथून पळ काढला असावा. विशेष म्‍हणजे पलायनासाठी संशयिताने सुवारिस यांचीच घरासमोर पार्क करून ठेवलेली कारगाडी वापरली. नंतर ही कार संशयितांनी सिकेरी हेलिपॅडवर सोडून दिली होती.

आता खुनाचे खरे कारण होणार स्‍पष्‍ट

ताब्यात घेतलेला संशयित हा ओर्डा परिसरात वास्तव्यास होता आणि यापूर्वी तो सुवारिस यांच्या घरी कामाला होता. त्यामुळे सुवारिस हे घरी एकटेच राहायचे व ते ‘कॅनडा रिटर्न’ होते याची कल्पना त्याला होती. पोलिसांनी दोघांना कर्नाटकमधून ताब्यात घेतले असून त्यांना गोव्यात आणले जात आहे. संशयितांची कसून चौकशी केल्‍यानंतरच या खुनाचे नेमके कारण तसेच इतर गोष्टींचा उलगडा होऊ शकेल. या खून प्रकरणातील मारेकऱ्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी विविध पथके तयार करून तपासाला गती दिली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Marathi Schools Goa: 'पालकांमुळे बंद पडल्या गोव्यातील मराठी शाळा'; शिक्षणमंत्री प्रमोद सावंत

Goa News Live Updates: मोबाईलवर नको, मैदानावर खेळा

Rishabh Pant Record: ऋषभ पंतने 'कॅप्टन कूल'चा रेकॉर्ड मोडला! आता क्रिकेटच्या देवाचा नंबर! करणार 'ही' मोठी कामगिरी

WWE सुपरस्टारची गोळ्या घालून निर्घृण हत्या, 18 वर्षांची कारकीर्द एका क्षणात संपली

Wild Vegetables: पावसाळ्यातील किमया! गोव्यातील चविष्ट रानभाज्या..

SCROLL FOR NEXT