Dead-Body Dainik Gomantak
गोवा

ताप आला म्हणून रुग्णालयात गेला पण तोपर्यंत उशीर झाला होता; गोव्यात पर्यटनासाठी आलेल्या 19 वर्षीय तरुणाचा मृत्यू

Goa News: मंगळवारी (०४ फेब्रुवारी) सकाळी अचानक त्याला ताप आला, त्याने रुग्णालयात धाव घेतली.

Pramod Yadav

पणजी: जंघई येथून गोव्यात पर्यटनासाठी आलेल्या १९ वर्षीय शाळकरी मुलाचा आकस्मिक मृत्यू झाला आहे. ताप आल्याने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले तिथेच त्याचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. मुलाच्या आकस्मिक मृत्यूमुळे त्याच्या घरच्यांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

आकाश कुमार (१९, रा. मीरगंज) असे या मृत झालेल्या युवकाचे नाव आहे. गेल्या आठवड्यात तो गावाकडून गोव्यात पर्यटनासाठी आला होता. मंगळवारी (०४ फेब्रुवारी) सकाळी अचानक त्याला ताप आला म्हणून त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले पण, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले, असे वृत्त एका आघाडीच्या हिंदी वृत्तपत्राने प्रसिद्ध केले आहे.

मंगळवारी सकाळी त्यांचे गोव्यात निधन झाले. घटनेची माहिती मिळताच नातेवाईकांमध्ये एकच खळबळ उडाली. बुधवारी आकाशचा मृतदेह गावात दाखल झाला. १९ वर्षीय आकाश सरोजा देवी आणि रामशंकर बिंद यांचा यांचा एकुलता एक मुलगा होता. आकाशच्या निधनामुळे त्याच्या घरच्यांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

आकाशच्या मृत्यूचे मूळ कारण समोर आलेले नाही. तसेच, तो मित्रांसोबत गोव्यात आला होता का एकटाच फिरण्यासाठी आला होता, याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. दरम्यान, एकुलता एक असणाऱ्या आकाशच्या निधनामुळे त्याच्या घरच्यांवर शोककळा पसरली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Canada Technology Deal: भारत-कॅनडा टेक डील! विद्यार्थ्यांना मिळणार एआय आणि डेटा सायन्सचे धडे, बंगळुरुमध्ये दीपस्पेशियलचे दोन मोठे करार

Goa Regional Development: गोव्याचे भौतिकशास्त्र आणि राज्यशास्त्र! कॅसिनो, खाणउद्योग अन् विकासाच्या राजकारणाचा वेध

प्रयत्ने साखरेचे कण वेचिता... तक्रारी सोडा, आनंदाचे क्षण निवडा; सुखी आयुष्याचा सुंदर मंत्र!

Egypt Tourism: इजिप्तचा गूढ वारसा! पिरॅमिड्सपासून नाईल नदीपर्यंत; इतिहास, संस्कृती अन् आधुनिकतेचा अद्भुत संगम

JNU Global Reputation: जेएनयूच्या पाण्यात काय आहे?

SCROLL FOR NEXT