Viral Video: 'आजीला यायचंय गोव्याला पण...'; फॅमिलीचा फनी व्हिडिओ एकदा पाहाच

Funny Viral Video: महाराष्ट्रातील एका आजीला देखील गोव्यात यायची घाई झालीय पण, तिच्या पतीने केलेल्या प्रश्नामुळे आजी निरुत्तर झाली आहे
Funny Viral Video
Funny Viral VideoDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: गोवा पर्यटनासाठीचा नेहमीच हॉटस्पॉट राहिला आहे. गोव्यात देश - विदेशातून पर्यटक सुट्यांचा आनंद घेण्यासाठी येत असतात. येथील निसर्गसौंदर्य, नयनरम्य समुद्रकिनारी, मोठा ऐतिहासिक वारसा, कॅसिनो, पार्टी स्पॉट आणि नाईटलाईफ याचे आकर्षण नसलेला पर्यटक विरळाच. दरवर्षी लाखो पर्यटक गोव्यात पर्यटनासाठी येत असतात. दरम्यान, महाराष्टातील एका आजीला देखील फिरण्यासाठी गोव्यात यायचंय.

गोव्यात सध्या पर्यटन हंगाम सुरु आहे. देश - विदेशातील पर्यटक गोव्यात दाखल व्हायला सुरुवात झाली आहे. विविध पारंपरिक उत्सवांना देखील येत्या काळात सुरुवात होईल. कार्निव्हल आणि शिगमोत्सवाचा जल्लोष मार्चपासून राज्यात पाहायला मिळेल त्यामुळे विविध ठिकाणांवरुन पर्यटक गोव्यात दाखल व्हायला सुरुवात झाली आहे.

महाराष्ट्रातील एका आजीला देखील गोव्यात यायची घाई झालीय पण, तिच्या पतीने केलेल्या प्रश्नामुळे आजी निरुत्तर झाली आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.

Funny Viral Video
FC Goa: अंधेरीत उजो! एफसी गोवाने 13 सामन्यांनंतर मुंबई सिटीला चारली पराभवाची धूळ; गोलचाही रेकॉर्ड

संदीप साळुंखे या वॉल्गरने याबाबत एक रिल इंस्टाग्रामवर शेअर केली आहे. द सॅन्डी वॉल्गज नावाने संदीप व्हिडिओ करतो. दरम्यान, त्याचा आजीचा हा व्हिडिओ सोशल मिडियावर चांगलाचा व्हायरल झाला आहे.

साळुंखे फॅमिली एकत्र गप्पा मारत असताना त्यांचा कुठेतरी फिरायला जाण्यावरुन चर्चा सुरु होते. प्रत्येकजण आम्हाला फिरायला जायंचय सांगत असताना आजी आम्हाला गोव्याला फिरायला जायचंय असं सांगते. पण, तुला रस्ता माहितेय का? असा प्रश्न आजीचे पती करतात आणि सर्वजण हसायला लागतात.

सध्या साळुंखे फॅमिलीचा हा व्हिडिओ सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल झाला असून, नेटकऱ्यांच्या पसंतीस उतरत आहे.

Funny Viral Video
Panaji Municipal Corporation: पणजीत सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पांवर अतिरिक्त ताण! साबांखा हतबल; टोंक येथे सांडपाण्याचे मर्यादेपेक्षा 120 अतिरिक्त टँकर

अनेकांनी या रिलवर कमेंट करताना आजीला आम्ही गोव्याला घेऊन जातो असे म्हटले आहे. तर, अनेकांनी रस्त्याची काळजी करु नका फक्त गाडीची व्यवस्था करा आपण जाऊ गोव्याला अशी कमेंट केली आहे. या रिलला आत्तापर्यंत अडीच लाख लाईक्स मिळाल्या आहेत. तर जवळपास एक हजार नेटकऱ्यांनी कमेंट केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com