drowned  Dainik Gomantak
गोवा

Goa News : सत्तरीतील वेळगे नदीच्या पात्रात बेती पर्वरीतील 18 वर्षीय युवक बुडाला

वाळपई अग्निशमक दलाच्या जवानांनी युवकाचा शोध घेतला

गोमन्तक डिजिटल टीम

बेती पर्वरी येथील 18 वर्षीय युवक सत्तरीतील वेळगे नदीच्या पात्रात बुडाल्याची घटना समोर आली आहे. वाळपई अग्निशमक दलाने रात्री उशिरापर्यंत शोध मोहिम राबवली मात्र युवकाचा ठावठिकाणा लागला नाही.

याबाबत अधिक माहिती अशी की, रविवारच्या सुट्टीच्या दिवशी बेती पर्वरी येथील 18 वर्षीय युवक शिवकुमार पवार व त्याच्या मित्रांचा ग्रुप वेळगे सत्तरी येथील राजग्योची कोंड या म्हादई नदी परिसरात आले होते. पोहण्यासाठी नदीत उतरले होते. त्यापैकी शिवकुमार हा नदीच्या प्रवाहात वाहून गेला तर आणखीन एकाला बुडताना वाचविण्यात साथीदारांना यश मिळाले.

घटनेची माहिती मिळताच वाळपई अग्निशमन दलाच्या जवानांना घटनास्थळी पाचारण करण्यात आले. शिवकुमार याचा शोध करण्यात आला. मात्र रात्र झाल्याने शोध मोहीम थांबविण्यात आली.

स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, येथील नदीच्या पात्रात भोवरा पडत असतो व अधून मधून पाण्याचा मोठा झोत मारत असतो तसेच या भागात मगरींचा वावरही असतो. बुडालेल्या युवकाला काठीचा आधारही देण्यात आला होता. पण त्यात यश मिळाले नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Socorro: मान्सूनच्या आगमनापासून वेगवेगळे रंग धारण करणारे 'सुकूर पठार'

"पत्नीसोबत Dinner की Sunrise बघायला आवडेल?" CM सावंतांच्या दिलखुलास गप्पा; Watch Video

Bits Pilani: 'बिट्स पिलानी मृत्यूप्रकरणी SIT नेमा'! NSUI ची मागणी; कायदा सुव्यवस्था कोलमडल्याचा आरोप

Bisons In Goa: लाखेरेत गव्यांसह रानडुकरांचा धुमाकूळ! लोकांमध्ये भीतीचे वातावरण; बागायतीची मोठी नासधूस

Goa Coastal Plan: गोवा सागरी आराखड्यास होतोय विलंब! सल्लागाराची अद्याप नेमणूक नाही; डिसेंबरपर्यंत पूर्ण होणार काम

SCROLL FOR NEXT